आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शनिवार अन् रविवार ठरणार ‘हॉट’ वार, तापमान ४१ अंशांपुढे जाऊ शकते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- याआठवड्यात आगमन झालेल्या परतीच्या पावसाच्या ढगांमुळे तापमानात वाढ झाली आहे. शुक्रवारी तापमानाचा पारा ३८ अंशांवर पोहोचला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शनिवार आणि रविवारी तापमान ४१ अंशांपुढे जाऊ शकते.
परतीच्या पावसामुळे आकाशात जमा झालेले ढग, आर्द्रता यामुळे सप्टेंबरमध्ये जळगावकरांना ऑक्टोबर हीटचा चटका जाणवू शकतो. बुधवारपर्यंत उकाडा कायम राहणार असला तरी येत्या दोन दिवसात मात्र अधिक चटका जाणवणार असल्याने हे दाेन दिवस ‘हॉट’ वार ठरण्याची शक्यता आहे. या वर्षात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नसताना दुसरीकडे तापमानाचा पारा कायम ३५ अंशांपुढे राहिला आहे. रात्रीचे तापमानदेखील २५ अंशांपेक्षा खाली आलेले नाही. सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हीटचा चटका जाणवत असल्याने आणखी दोन महिने उन्हाळ्यासारखीच अवस्था होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी जळगाव शहरात ३८ अंश तापमान नोंदवले गेले.

पावसाची शक्यता
पंजाब,हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये परतीचा पाऊस जोर करत आहे. महारा‌ष्ट्रातदेखील गेल्या चार-पाच दिवसांपासून अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी वातावरण ढगाळ आणि आर्द्रताही वाढल्याने उकाड्यात वाढ झाली होती. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुढील आठवड्यातदेखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पारा ४१ अंशांकडे
येत्यादोन दिवसांत तापमान ४१ अंशांपुढे राहील. ढगाळ वातावरणामुळे तापमानासोबतच उकाडाही आणखी वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी २७ सप्टेंबर १९८७ रोजी तापमान ३९.८ अंशांवर गेले होते. पावसाळा असूनही १० ऑगस्ट १९६६ रोजी तापमान ४०.४ अंशांवर होते. तर जुलै १९९३ रोजी तापमान तब्बल ४३.९ अंशांवर पोहोचले होते. यापूर्वीचे रेकॉर्ड बघता येत्या दोन दिवसांतदेखील तापमान आणि उकाडा जळगावकरांना हैराण करण्याची शक्यता आहे.