आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Savarkar Jayanti Celebration Issue At Jalgaon,, Divya Marathi

रिक्षा रॅली काढून स्वातंत्र्यवीरास अभिवादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त बुधवारी शहरात रिक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अँड.अ.वा.अत्रे, महापौर राखी सोनवणे, विभागीय पोलिस निरीक्षक प्रशांत बच्छाव उपस्थित होते.

रिक्षा रॅलीचे उद्घाटन प्रशांत बच्छाव यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. रॅली स्टेट बॅँक चौक, कोर्ट चौक, स्टेशनरोड, जिल्हा परिषद, टॉवर चौकमार्गे जुने बस स्टॅँड, शिवाजी पुतळा, स्वातंत्र्य चौक येथे आली. तेथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आली.
याप्रसंगी अध्यक्ष दिलीप सपकाळे, सचिव भानुदास गायकवाड, अशोक चौधरी, विलास ठाकूर, बंटी चौधरी, शशिकांत जाधव, मनोज पवार, सुभाष पाटील, दत्तात्रय खर्चाणे, कैलास विसपुते, मोतीलाल पाटील, अनिल निळे, एकनाथ बारी, रहिम देशमुख, बाळू सोनवणे, रंजित नार्सक, किसन पाटील, भरत पाटील, अशोक पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, संजय पाटील, रमेश ठाकूर, पोपट ढोबळे, मोहन मराठे, अरुण कोळी, संभाजी पाटील, रमेश राठोड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.