आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावरकर समजून घ्या, जटिल प्रश्नही सुटतील; अरविंद कुलकर्णी यांचा भाजपला सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक: भाजपचे सरकार केंद्रात अाणि राज्यातही अाहे, म्हणूनच या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर समजून घेतले तर गेल्या ७० वर्षांतील जटील अाणि अवघड वाटतात प्रश्न सहज सुटतील. अापण प्रदीर्घ काळ पारतंत्र्यात राहिल्यामुळे हिंदू हित कशात अाहे, हेच विसरून गेलाे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरविंद कुलकर्णी यांनी केले. 
 
स्वातंत्र्यवीर सावरकर जन्माेत्सवाचा समाराेप रविवारी (दि. २८) कालिदास कलामंदिरात झाला. त्यावेळी ‘अाजच्या काळात सावरकरांच्या विचारांची उपयुक्तता’ या विषयावर बाेलताना कुलकर्णी म्हणाले, की बाराशे वर्षे विविध परकीय अाक्रमणे अाणि पारतंत्र्यात रहाणाऱ्या देशात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे सरकार पहिल्यांदा सत्तारूढ हाेते, त्याने मागील काळातील जळमटे काढून फेकली पाहिजेत. मात्र, प्रदीर्घ काळ पारतंत्र्यात राहिल्याने हिंदु हित कशात अाहे, हेच अापण विसरून गेलाे. ब्रिटिशांना या देशावर सावरकरांच्या विचारांचा प्रभाव नकाे हाेता; कारण त्या काळातील कर्तव्यबुद्धीने वागणारे ते एकमेव नेते. सावरकर अापल्यावर असलेला पारतंत्र्याचा प्रभाव अामुलाग्रपणे बदलू पाहत हाेते.
 
अाज याचमुळे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचाही काही लाेक विराेध करीत अाहे. अाज सगळ्या जगाला ही भीती अाहे की धर्मनिरपेक्ष अाणि सगळ्यांना साेबत घेऊन जाणारा सावरकरवाद माेदींमुळे भारतात स्थिर हाेईल का, ज्यामुळे जगाचे नेतृत्व भारताकडे येईल. अांतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारणाचा भाग म्हणून या विषयाकडे पाहिले जात अाहे. राज्य सरकारने ‘माझी जन्मठेप’ हे सावरकरांचे पुस्तक प्रत्येक शाळेत वितरित केले तर हे पुस्तक वाचणारा कुणीही अात्महत्त्या करणार नाही, असा अाशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 
 
जन्माेत्सवाचा हा उपक्रम अाता राज्याच्या २६ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात अाले. सावरकरांच्या जीवनावरील ‘अनादी मी अवध्य मी’ या कार्यक्रमाने जन्माेत्सवाची सांगता झाली. 

रामभाऊ म्हाळगी प्रबाेधिनीचे रवींद्र साठ्ये, गीता उपासनी, अरविंद कुलकर्णी अाणि लक्ष्मण सावजी यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर जन्माेत्सव समिती अाणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड व्यासपीठावर हाेते. 
 
तर ताे देश रसातळाला जाताे : उपासनी 
ज्या देशात राष्ट्रवीरांचा उपमर्द हाेताे, ताे देश-समाज रसातळाला जाताे, हा इतिहासाचा दाखला देत सावरकरांची अातापर्यंत झालेली निंदा, टीका करण्याने त्यांचे काहीच नुकसान हाेणार नाही; मात्र हानी अापली हाेणार अाहे. म्हणूनच जी हानी झाली ती भरून काढणे अापले काम असल्याचे मत सावरकर विचारांच्या प्रसारक गीता उपासनी यांनी यावेळी व्यक्त केले. यू ट्यूबच्या माध्यमातून सावरकरांनी लिहिलेले ‘माेपल्याचे बंड’ दाेन महिन्यांत जगभरातील २५ लाख लाेकांपर्यंत पाेहाेचल्याचे सांगत अाता अापण हिंदूंचा इतिहास किती विजयाचा अाहे, ताे पराजयाचा नाही हे सांगणारी सावरकरांचीच ‘सहा साेन्याची पाने’ हे लिखाण याचप्रकारे जगभरात पाेहाेचविणार असल्याचे उपासनी यांनी सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...