आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसपीएफ पाहूनच निवडा सनस्क्रीन, कडक उन्हाचा तरुणी, महिलांवर जास्त परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- कडक उन्हाचा परिणाम खासकरून तरुणी आणि महिलांवर जास्त होतो. सूर्याच्या तीव्र किरणांमुळे त्वचेच्या विकारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे चेहरा आणि हातांची काळजी घेणे आवश्यक आहे. केवळ सनकोट हातमोजे घालून चेहऱ्याला स्कार्फ बांधल्यास त्वचा काळवंडणे कमी होते असे नाही, तर उष्ण वारे वाफा (झळा)देखील घातक ठरू शकतात. त्यासाठीचे प्रॉडक्ट्सदेखील काळजीपूर्वक वापरायला हवे. त्यामुळे त्वचेसाठी वापरल्या जाणाऱ्या सनस्क्रीनमध्ये अधिक एसपीएफ (सन प्रोटेक्शन फॅक्टर) असायला हवे. तसेच त्वचेच्या प्रकारानुसार सनस्क्रीन लोशन निवडावे.
दोन प्रकारात मिळते सनस्क्रीन
बाजारात दोन प्रकारचे सनस्क्रीन मिळतात. त्यात २०पेक्षा अधिक एसपीएफ असलेल्या केमिकलच्या सनस्क्रीनचा समावेश आहे. पण, फिजिकल सनस्क्रीनमध्ये केमिकल कमी असते त्याचे एसपीएफ २०पेक्षा कमी असते. अॅण्टिटॅन सनस्क्रीन लोशन त्वचेला गोरे बनवते.
एसपीएफचे रेटिंग अन् उपयोग
सनस्क्रीन किंवा सनब्लॉक तुम्हाला कोणत्या पातळीपर्यंत उपयुक्त ठरते, हे लगेच समजू शकते. त्वचेचा रंग गोरा असेल तर तुम्ही एसपीएफ २५ सावळ्या रंगाच्या त्वचेसाठी एसपीएफ ३०पर्यंत असलेले सनस्क्रीन लावू शकता. आपल्या त्वचेचा प्रकार उन्हात गेल्यावर किती मिनिटांनी ती लाल हाेते त्याच्या वेळेला १०ने गुणावे. जर तुमच्या क्रीममध्ये २० एसपीएफ असेल आणि त्वचा मिनिटांनी लाल हाेत असेल, तर १४० मिनिटांनी तुम्हाला सनस्क्रीन परत लावावे लागेल. तसेच यामुळे तुमची त्वचा काळवंडत नाही जास्त काेरडीसुद्धा पडत नाही. ज्या व्यक्तीला त्वचेचा विकार असेल त्याने वैद्यकीय सल्ला घेऊनच सनस्क्रीन वापरावे. त्वचेच्या प्रकारानुसार क्रीम दर चार तासांनी वापरावी.
त्वचेचा प्रकार तपासून उपचार करा
- सनस्क्रीन लावताना सरळ चेहऱ्यावर ते लावू नये. बाहेर जाण्याच्या १० मिनिट अगोदर तरी लोशन लावावे. तसेच त्या अगोदर काहीतरी क्रीम लावावे. व्हिटॅमीन सी युक्त सनस्क्रीन बाजारात मिळतात. यामुळे त्वचेवरील रिंकल काळे डाग कमी होण्यास मदत होते. मात्र हे सगळे करताना तुमच्या त्वचेचा प्रकार अगोदर तपासून घ्यावा नाही तर उलट त्रास होण्याचाही धोका असतो.
डॉ. काजल फिरके.
गोरी संवेदनशील :४० एसपीएफ
डार्क त्वचा : ३० एसपीएफ
फक्त गोरी त्वचा ३० एसपीएफ
व्हिटीश त्वचा ३० एसपीएफ
डस्की त्वचा २५ एसपीएफ