आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती परीक्षेत 10 विद्यार्थी राज्याच्या यादीत, सीबीएसईचे सहा तर शहरी भागातले चार विद्यार्थी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्यातील पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच महाराष्ट्र शिक्षण परीक्षा परिषदेने जाहीर केला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील 10 विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकले आहेत.

महाराष्ट्र शिक्षण परीक्षा परिषदेने काही दिवसांपूर्वी या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर केला. परंतु, त्यासोबत गुणवत्ता प्रसिद्ध केली नव्हती. गुरुवारी सायंकाळी जिल्हानिहाय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. यात जळगाव जिल्ह्यातून 10 विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकले आहेत. यात चौथीचे दोन विद्यार्थी शहरी भागातून तर एक विद्यार्थी सीबीएसईचा आहे. सातवीसाठी दोन विद्यार्थी शहरी भागातून तर पाच विद्यार्थी सीबीएसईचे आहेत. यात ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी नाही. दोन्ही मिळून सीबीएसईचे सहा विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी बजावली आहे.
चौथी - पूर्व माध्यमिक : हर्षला महाजन, डॉ. प्रमिला पूर्णपात्रे स्कूल, चाळीसगाव 288 (चौथा क्रमांक), सिद्धेश पाटील, सेंट अलायन्स भुसावळ 278 (नववा), भावेश पाटील, रुस्तमजी इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई) 272, सातवी : माध्यमिक शिष्यवृत्ती : भूषण भाले, के. नारखेडे स्कूल 274 (आठवा), प्रसाद ठोंबरे, ओरिऑन इंग्लिश स्कूल जळगाव 270 (दहावा). सीबीएसई - शंकर शाह, सेंट जोसेफ 270 (सहावा), भाविका पाटील, पलोड स्कूल 270 (सहावी), विपिन ओचिरामणी, सेंट जोसेफ 262 ( दहावा), आदित्य देशमुख, सेंट जोसेफ 260 (अकरावा), सौमिल शाह सेंट जोसेफ 256 (13 वा).
जिल्ह्याची गुणवत्ता यादी
देवकर स्कूलचे सात विद्यार्थी : सु.ग. देवकर प्रायमरी स्कूलचे सात विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत आले. यात वैष्णवी चिरावंडे 256 (11 वी), प्रभाकर नंदकुमार बारी 248(15 वा), अनिरुद्ध चव्हाण 248(17 वा), तेजस साळुंखे 244(17 वा), वैभव देवज्ञ 236(21 वा), वैभवी पवार 234(22 वी), साहिल कोळी 232(23 वा) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
झांबरे शाळेचे पाच विद्यार्थी : ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील पाच विद्यार्थी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चमकले. यात माधवी आव्हाड 250, जागृती पाटील, धनर्शी सुरवाडे 224, रंजना पाटील व स्नेहा झांबरे यांनी 210 गुण मिळवून यश मिळवले.