आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Scholarship Issue At Jalgaon, Student Harassment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रमासाठी शाळांकडून विद्यार्थ्यांची लूट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- विद्यार्थ्यांना शिक्षणात हातभार लावणार्‍या शासनाच्या शिष्यवृत्तीच्या उपक्रमाचा शहरातील काही शाळांनी पुरता बट्टय़ाबोळ केला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना मदत मिळवून देणार्‍या शिष्यवृत्तीच्या जादा तासिकेसाठी एक ते दोन हजार रुपये देण्याची सक्ती सर्रास शाळांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोफत जादा तास घेतले जात असताना खासगी शाळांकडून मात्र अडवणूक होत आहे.
शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिध्द करावी तसेच त्यांना शिक्षणासाठी शासकीय मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने इयत्ता 4 थी व 7 वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना 10 रुपयांचा प्रवेश अर्ज भरून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपला प्रवेश निश्चित करता येतो. खुल्या प्रवर्गातील 4 थीच्या विद्यार्थ्यांसाठी 22 रुपये आणि 7 वी साठी 33 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागत असताना शहरातील काही शाळांकडून सक्तीने दोन ते अडीच हजार रुपयांची मागणी केली जात आहे. जादा तासिकेसाठी ही रक्कम देण्याची सक्त केली जात आहे. विशेष म्हणजे नियमाप्रमाणे या परीक्षेचा अभ्यासक्रम वर्गातील शिक्षकांनी घेणे बंधनकारक आहे. हा अभ्यासक्रम वर्गातील अभ्यासक्रमावरच आधारित आहे. यात केवळ बुध्दीमत्ता आणि गणित विषयावर जास्त भर देण्यात आला आहे. यासाठी वर्गातील शिक्षकाने तयारी करून घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी जादा तास घेणे अभिप्रेत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरल्यानंतर विद्यार्थ्याला तीन वर्षांपर्यंत प्रत्येकवर्षी एक हजार रुपये प्रमाणे शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. या मिळणार्‍या शिष्यवृत्तीची वसुलीच शाळांकडून करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांना लुटणार्‍या अशा खासगी शाळांकडे शिक्षण विभागाचे लक्ष नसल्याने पालकांतून नाराजी व्यक्त होत आहे.