आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रशासन अधिकार्‍यांचा पत्रव्यवहार संशयास्पद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सर्व शिक्षा अभियानाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून जळगाव महापालिकेच्या शिक्षामंडळाच्या शाळांमध्येही गणवेश घोटाळा झाल्याचे आरोप होत आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून तत्कालीन प्रशासन अधिकार्‍यांनी गणवेश शिलाईसंदर्भात केलेला पत्रव्यवहार संशयाच्या भोवर्‍यात अडकण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर फारसे प्रयत्न होता औरंगाबाद येथून गणवेश शिलाई करण्यामागील हेतू काय यादृष्टीने चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणातील गौडबंगाल पुढे येणार असल्याने संबंधितांच्या उरात यामुळे धडकी भरली आहे.
निधी खर्च न करण्याचे पहिले पत्र - तत्कालीन प्रशासन अधिकार्‍यांनी गणवेश वितरणासंदर्भात 28 मार्च 2011 रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि केंद्र प्रमुखांना पत्रव्यवहार केला होता. यापत्रात गणवेश वितरणासंदर्भात शासनाचे निर्देश काय आहेत. खर्च किती करायचा आहे. गणवेशाबाबत तक्रारी असल्यास शाळा व्यवस्थापन समिती व सचिव जबाबदार असतील या स्वरूपाचे 10 मुद्दे दिले आहेत. मात्र, खाली एक टीप टाकली आहे. यामध्ये या कार्यालयाकडून पुढील सूचना येईपर्यंत गणवेशाबाबत निधी खर्च करण्यात येऊ नये, अशी टीप टाकण्यात आली आहे.

दुसर्‍या पत्रात औरंगाबादचा संदर्भ - गणवेश पुरवठय़ासंदर्भात प्रशासन अधिकार्‍यांनी 13 नोव्हेंबर 2011 रोजी मुख्याध्यापकांना पाठविलेल्या पत्रात र्शद्धा महिला विकास मंडळ, पहाडसिंगपुरा लेणी रोड, औरंगाबाद ही शिलाई करणार्‍या संस्थेचा पर्याय सूचवला आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने सदर संस्थेचा गणवेश शिलाईचे काम देण्यासाठी आपल्या स्तरावरून कार्यवाही करण्याची शिफारस करण्यात आली आहे.