आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा मंडळ तपासणार प्रयोगशाळांची सिद्धता

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शाळांमधील प्रयोगशाळांची अद्ययावत साधनांनी सिद्धता व त्यांची उपयोगिता तपासण्यासाठी माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाने प्रयोगशाळांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
या वर्षी या मोहिमेचा वेग कमी असला तरी पुढील वर्षापासून नाशिक जिल्ह्यासह धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांमधील माध्यमिक शाळांमधल्या प्रयोगशाळांची तपासणी शिक्षणाधिकारी करणार आहेत. विद्यार्थ्यांचे 100 पैकी 40 गुण हाती असलेल्या शाळासदर गुण कोणत्या आधारावर देतात, हे तपासणे यासाठी ही मोहीम आहे. विज्ञानाचे वाढते महत्त्व लक्षात घेता प्रयोगशाळा या सर्व सुविधांनी युक्त असाव्यात, तसेच प्रयोगवहीपुरताच तिचा वापर मर्यादित राहू नये हादेखील उद्देश यामागे आहे.
तपासणीचे निकष
* भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या तिन्ही विषयांसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा
* संगणकीय विभागात किमान दहा अद्ययावत संगणक असणे आवश्यक
* प्रयोगशाळांमध्ये आधुनिक साधनसामग्री
* विद्यार्थ्यांचा प्रयोगशाळेचा वापर समाधानकारक
* प्रयोगवहीव्यतिरिक्तदेखील प्रयोग करण्यास मुभा व तशी सुविधा
2700 हून अधिक शाळा - चार जिल्ह्यांतील 40 तालुक्यांमध्ये 2700 हून अधिक माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमधील प्रयोगशाळांची तपासणी करण्यासाठी केंद्रांवर नियोजन सुरू आहे.