आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन विद्यार्थी सुसाट; रस्त्यांवरून चालणे झाले मुश्किल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- विनापरवाना सुसाट वेगाने गाड्या पळवणार्‍या अल्पवयीन विद्यार्थ्यांमुळे शहरातील रस्त्यांवरून चालणे मुश्कील झाले आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी वाहतूक शाखेकडून कोणतेही प्रयत्न नाहीत, हे विशेष!

आधीच अरुंद आणि त्यातही वाढलेल्या अतिक्रमणामुळे शहरातील रस्त्यांचा श्वास गुदमरला आहे. वाहनांच्या वाढलेल्या कोंडीत अल्पवयीन मुले, मुली आणि विद्यार्थी कोणत्याही परिणामाची पर्वा न करता भरधाव वेगाने वाहने घुसवतात. यामुळे केवळ पायी चालणारेच नव्हे, तर रस्त्यावरील दुसर्‍या वाहनचालकांच्या जीवालासुद्धा धोका आहे. विनापरवाना वाहन चालवणार्‍या मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या लक्षणीय आहे. सकाळी शाळा-कॉलेजेस भरताना, सुटल्यावर आणि शिकवणीला जाताना वाहनांवर वेगवेगळे स्टंट करण्याचे प्रकारही शहरात दृष्टीस पडतात. जामनेर आणि यावल रोडसारख्या प्रचंड रहदारीच्या रस्त्यांवरील हे चित्र कायमचे असले तरी कारवाईचा अभाव आहे. शांतीनगर, तापीनगर, जामनेररोड, सहकारनगरात खासगी शिकवण्यांचे अनेक वर्ग चालतात. बहुतांश विद्यार्थी शिकवणीला येताना दुचाकींचा वापर करतात. रहिवासी वस्तीतून भरधाव वेगाने वाहने चालवताना कोणतीही काळजी घेतली जात नाही.