आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘चेस इन स्कूल’मुळे विद्यार्थी होताहेत चलाख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मुलांची खिलाडूवृत्ती जपत त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी तसेच त्यांच्या भविष्याच्या दृष्टीनेही उपयुक्त असणार्‍या बुद्धिबळ खेळाला अनेक शाळा प्राधान्य देत आहेत. फक्त मैदानी खेळांवर भर न देता सध्या बहुतांश शाळांमध्ये बुद्धिबळाचा खेळही शिकवला जात आहे. शाळेतील अंतभरूत खेळांमध्ये त्याचा समावेश केला आहे. या खेळात सहभागी होणार्‍या बालकांच्या शैक्षणिक प्रगतीत चांगला बदल दिसून येत असल्याने ‘चेस इन स्कूल’ उपक्रमाला वाढता प्रतिसाद मिळत आहे.
बुद्धिबळाचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याने नुकतेच प्रत्येक शाळेमध्ये बुद्धिबळ खेळण्यास प्रोत्साहन देण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. महाराष्ट्रातील ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी अनेक वर्षांपूर्वीच या खेळाचे अभ्यासक्रमातील महत्त्व जाणून त्या दिशेने प्रय}ही सुरू केले आहेत. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक शाळांमध्ये ‘चेस इन स्कूल’ हा उपक्रम राबवला जात आहे. शहरातील उज्ज्वल स्प्राउटर, पोदार स्कूल, सेंट टेरेसा, रुस्तमजी, अनुभूती सारख्या अनेक शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे.
अभ्यासक्रमात खेळाचा सहभाग
शहरातील शाळांनी या खेळाला अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे. महिन्यातून चार तासिका होतात. दोन खेळांचे त्यांना पर्याय निवडावे लागतात. त्यामध्ये बुद्धिबळाचा समावेश आहे. त्यानुसार विद्यार्थी या खेळाशी जुळत आहेत. एक विशिष्ट तासाद्वारे हा खेळ शिकवला जात असल्यामुळे शहरातील मुलांचा याकडे कल वाढला आहे.