आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय अभ्यासक्रमात हवे संगीताचे नियमित शिक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- भारतीय संगीताला जिवंत ठेवण्यासाठी मुलांच्या शालेय अभ्यासक्रमात संगीताचे शिक्षण सक्तीचे करायला हवे. शासनाच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये त्यांच्या नियमानुसार तर खासगी शाळांमध्ये त्यांच्या नियमाप्रमाणे शिक्षण द्या. पण वरचेवर शिक्षण देण्यापेक्षा मूळ आणि खरे शिक्षण द्यायला हवे, असे प्रतिपादन पंडिता कौशिकी चक्रवर्ती यांनी के ले.
एनसीपीए आणि चांदोरकर प्रतिष्ठान यांच्यातर्फे शनिवारी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी एनसीपीएच्या डॉ. सुवर्णलता राव, प्रतिष्ठानचे दीपक चांदोरकर देखील उपस्थित होते.

संगीताने मिळू शकतात गुण
संगीत आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आपल्या आरोग्यावर संगीताचा खूप चांगला परिणाम होतो हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे आपली एकाग्रता तर वाढते परंतु बोलणे, वागणे यात चांगला फरक तर मानसिकरीत्यादेखील आपण सक्षम राहतो. हे मुलांच्या बाबतीत अधिक जाणवते. तरीदेखील एका हौसेखातर शाळेत शिक्षण घेतले जाते. दहावीत ते बंद होते व नंतर करिअरचा विचार तरुणपिढी करीतच नाही. संगीत शिकल्यास मुले नापास नाही होणार खरे तर अधिक चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतील. सगळीकडे आपण पैसे भरतो फक्त संगीताच्या कार्यक्रमाचे तिकीट घ्यायला परवडत नाही.
नवोदित कलावंतांना एनसीपीए देते संधी
डॉ. सुवर्णलता राव म्हणाल्या की, गेल्या 45 वर्षांपासून ही संस्था कार्यरत आहे. ललित कलेचे जतन, प्रचार, प्रसार करणारी ही संस्था भारतीय कलांसोबतच पाश्चात्य कलेलाही व्यासपीठ उपलब्ध करून देते. मुंबईपर्यंत र्मयादित न राहता इतरही लोकांना मोठय़ा कलावंतांना ऐकता यावे, यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. अनेक प्रख्यात कलावंतांना घेऊन आम्ही सध्या कार्यक्रम करीत आहोत.
पाश्चात्यांचे अनुकरण नको त्या गोष्टीत
आपण पाश्चात्यांचे अनुकरण करतो. पण परदेशात प्रत्येक शाळेतील मुलाला प्रत्येक वाद्याचा अभ्यास आहे. त्या वाद्याचे बारीक ज्ञान असते. त्यांना लहानपणापासूनच योग्य शिकवले जाते. त्यांचे शिक्षकही तेवढे शिकवण्यास उत्सुक असतात. याचेही अनुकरण करायला हवे. आपल्याकडे जो शिकवतो त्यालाच अपूर्ण ज्ञान असते. विद्यार्थ्यांना वाद्यांतील फरक माहिती नाही. भारतीय शास्त्रीय संगीत, भारतीय संगीत सोडून द्या; पण सध्या तरुणाई जे पाश्चात्य संगीत ऐकते, त्यांना आवडते त्याचे तरी पूर्ण ज्ञान त्यांना आहे का हे विचारा.