आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 लाख पॅकेज नाकारून गावच्या शाळेसाठी धडपड; जळगावच्या शिक्षकाचा ‘काबिल’ उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धानोरा (जि. जळगाव)- दिल्ली पब्लिक स्कूलमार्फत सौदी अरेबियातील आंतरराष्ट्रीय शाळेत झालेली निवड आणि वार्षिक १८ लाखांचे पॅकेज नाकारून आपल्याच गावातील शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवण्याचा संकल्प एका शिक्षकाने केला. राष्ट्रीय प्रशिक्षक धानोरा जिल्हा परिषद उर्दू शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सय्यद अल्ताफ हसन अली यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “काबिल’ हा आगळा उपक्रम हाती घेतला असून, सध्या तो जोरदार चर्चेत आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट शिक्षणात असले तरी इयत्ता नववीपासून हा घटक अंमलात आणले जाते. परंतु धानोरा शाळेतील काबिल या नावीन्यपूर्ण उपक्रमात पहिलीपासूनच विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आॅगस्ट २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
शाळेच्यावेळेखेरीज उपक्रम : सय्यदअल्ताफ अली हे व्यक्तिमत्त्व विकास जीवनकौशल्याचे राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त वेळेत ते हा काबिल उपक्रम राबवणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अली यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निरुपमा डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली २००७ ते २०१३ या काळात जिल्हा समन्वयक असताना जिल्ह्यातील १८०० शाळांमध्ये मेक इंग्लिश इझी आणि ईद- दिवाली सप्ताह हे नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करून दाखविले. देशात ७०वर ट्रेनिंग सेमिनार आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा त्यांनी घेतल्या आहेत.

उपक्रमाची उद्दिष्टे
>नेतृत्वगुण, व्यक्तिमत्त्व विकास स्वावलंबन.
>जीवनकौशल्ये रुजवून ध्येय निश्चिती करणे.
>सकारात्मक दृष्टिकोन, वेळेचे व्यवस्थापन.
>प्रभावी संभाषण कौशल्य विकसित करणे.
>स्वतःला निरोगी आणि आनंदित ठेवणे.
बातम्या आणखी आहेत...