आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांची पाटी कोरीच; बदलीनंतरही दोन शिक्षकांची दांडी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शैक्षणिक सत्राला सुरुवात होण्यापूर्वीच पंचायत समिती आणि जिल्हास्तरावर शिक्षक बदलीची प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये जिल्ह्यातील 48 शिक्षकांची जिल्ह्याबाहेर आपसी बदली झाली. मात्र, यामुळे रिक्त झालेल्या जागांवर जिल्ह्याबाहेरून बदलून आलेले शिक्षक अद्यापही हजर झालेले नाही. तालुक्यात हतनूर आणि आचेगाव शाळेत दोघा शिक्षकांची प्रतीक्षा आहे.

मे महिन्यात शिक्षकांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्यांची प्रक्रिया पार पडली. बदली प्रक्रियेत जिल्ह्यातील 148 शिक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत. यामध्ये 48 शिक्षकांची म्यॅचुअल (आपसी) बदलीमध्ये समावेश आहे.

दुसर्‍या जिल्ह्यातून बदली होऊन आलेल्या शिक्षकांनी जिल्हा पातळीवर हजेरी नोंदवली. मात्र, काही शिक्षकांनी सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी म्हणून अजूनही नियुक्तीच्या जागी हजेरी लावलेली नाही. बदली झालेल्या शिक्षकांनी पहिल्याच दिवशी शाळांवर हजेरी लावणे बंधनकारक आहे.

मात्र, भुसावळ तालुक्यात आचेगाव आणि हतनूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील दोन शिक्षकांनी 15 दिवस झाले तरी दर्शन दिलेले नाही. त्यामुळे शासनाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असले तरी प्रशासन मात्र ढिम्म असल्याने लोकभावना तीव्र झाल्या आहेत.