आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Transport Auto Rickshaw Driver Strike Jalgaon

रिक्षावाले काका झाले मुजोर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पोलिस वाहतूक शाखेने केलेल्या धडक कारवाईच्या विरोधात शालेय वाहतूक करणार्‍या रिक्षा चालकांनी शुक्रवारी सकाळी सहा वाजेपासून अचानक बंद पुकारला. त्यामुळे विद्यार्थी-पालकांचे अतोनात हाल झाले. तथापी, एका रियर रिक्षेत पाच आणि टाटा मॅजिकमध्ये दहा विद्यार्थीच बसवावे, असा पवित्रा वाहतूक शाखेने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सध्याचे भाडे दुपटीने करावे लागणार आहे. त्यामुळे रिक्षा संघटनेने पालकांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. पण शनिवारी मुलांना घेण्यासाठी रिक्षा जाणार नसल्याचे रिक्षा संघटनेतर्फे सांगण्यात आले.

ऑटो रिक्षांमध्ये पाच विद्यार्थींच बसवावे, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. परंतु, सर्रासपणे एका रिक्षेमध्ये दहाहून अधिक विद्यार्थी बसविले जातात. गेल्या वर्षी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, परिवहन कार्यालय आणि रिक्षाचालकांच्या बैठकीत एका रिक्षेत दहा विद्यार्थी बसविण्यास छुप्या पद्धतीने मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार वर्षभर कार्यवाही केल्याचे रिक्षाचालक संघटनेतर्फे सांगण्यात आले. धुळे येथे शाळकरी विद्यार्थी ट्रकखाली चिरडला गेल्याची घटना घडली होती. त्यापार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी वाहतूक शाखेला तंबी दिल्यानंतर शहरात रिक्षाचालकांविरुद्ध कारवाईचे सत्र सुरू केले. दोन दिवसात 15 रिक्षाचालकांवर कारवाई करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे रिक्षाचालकांनीही संतप्त पवित्रा घेतला. रिक्षाचालकांनी शुक्रवारी बंद पुकारला. शाळेतील उपस्थिती निम्म्यावर होती. ऐनवेळी पालकांना फोन करून संप असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले.

पालक म्हणतात..
बंदबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. रिक्षा येण्याची वेळ झाली. तरीही रिक्षा न आल्याने विचारपूस केली असता रिक्षाचालकांचा संप असल्याचे कळाले. त्यानंतर स्वत: मुलाला सोडण्यासाठी शाळेत जावे लागले. प्रवीण देवरे, पालक, शिव कॉलनी

शाळेची वेळ होऊन रिक्षा आली नाही. त्यामुळे मोटारसायकलवर मुलाला आर.आर.शाळेत सोडण्यासाठी धावपळ उडाली. अनिल गडे, पालक, गणेश कॉलनी

व्यवस्थित वाहतूक
रिक्षामध्ये प्रवास करणारे विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील असून एका रिक्षेत दहा विद्यार्थी नेणे रिक्षाचालक आणि पालकांनाही परवडणारे होते. वाहतुकीच्यादृष्टीने रिक्षांना जाळय़ा बसविल्या आहेत. वर्षभरापासून व्यवस्थित सुरू असताना अचानक शहर वाहतुकीकडून कारवाई कशासाठी? एखाद्या जिल्ह्यात घटना घडली म्हणून इतरांनाही जबाबदार धरणे चुकीचे आहे. दिलीप सपकाळे, जिल्हाध्यक्ष, वीर सावरकर रिक्षा युनियन

रिक्षा बंदची सूचना पालकांना नसल्यामुळे त्यांची तारांबळ उडाली. शाळा भरण्याची सकाळी 8 वाजेची वेळ होती. पण बर्‍याच विद्यार्थ्यांना घेऊन पालक साडेआठ-पावणेनऊ वाजेपर्यंत शाळेत येत होते. संदीप साठे, मुख्याध्यापक, ओरिऑन इंग्लिश मीडियम

15 रिक्षाचालकांवर दाखल झाला गुन्हा
नियमापेक्षा जादा विद्यार्थी वाहतूक केल्याप्रकरणी 15 रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. यात रहीम देशमुख पाळधी (रिक्षा क्र. एमएच-19, जे-6925), ज्ञानेश्वर पाटील खोटेनगर (एमएच-19, वाय-6171), प्रदीप भावसार शिरसोली (एमएच-19, वाय-8922), मुकेश चौधरी आहुजानगर (एमएच-19, एक्स-3501), संजय बाविस्कर (एमएच-19, व्ही-0097), शेख जावेद मुश्ताक पिंजारी (एमएच-19, वाय-6240), प्रशांत कोळी कुसुंबा (एमएच-19, वाय-6816), मोहन जोशी पिंप्राळा (एमएच-19, व्ही-3307), नंदकिशोर बारी शनिपेठ (एमएच-19, व्ही-0933), विक्रम पवार कुसुंबा (एमएच-19, व्ही-0769) संजय कोळी मकरा पार्क (एमएच-19, व्ही-5653) यांचा समावेश आहे.

रामकृष्ण भोसलेंना थेट सवाल
अचानक रिक्षांवर कारवाई कशी काय? सर्वोच्च् न्यायालयाच्या निकालाप्रमाणे पाचपेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास ती बेकायदेशीर वाहतूक आहे. त्यानुसार जास्त विद्यार्थी आढळून आलेल्या रिक्षांवर कारवाई केली.

निकाल आजचा नाही. मग कारवाई आजच का? रिक्षाचालकांवर कारवाई नेहमीच सुरू असते. आज कारवाईची संख्या मोठी असल्यामुळे हा प्रकार सुरू आहे.