आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा होणार तंबाखूमुक्त!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शैक्षणिकसंस्था शाळांच्या आवारात तंबाखूसह तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावरील निर्बंधाबाबत शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढले आहे. शाळेच्या प्रत्येक प्रवेशद्वाराच्या आत प्रत्येक मजल्यावर जनि्यासह तसेच लिफ्टच्या प्रवेशद्वारावर लाल रंगात ‘धूम्रपान निषदि्ध क्षेत्र’ लिहिलेला लोगो बंधनकारक करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या ‘सिगारेट तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा सन २००३’ची अंमलबजावणीच्या अनुषंगाने शाळांच्या प्रवेशद्वारापासून १०० मीटरच्या परिघात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घालण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाने जुलै रोजी हे परिपत्रक काढले आहे. तंबाखू नियंत्रण कायद्यात कलम ४नुसार शैक्षणिक संस्थांसह सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी आहे. कलम (अ) नुसार तंबाखू विक्री लहान मुलांना आणि लहान मुलांकडून करून घेण्यास बंदी आहे. कलम (ब) शैक्षणिक संस्थांपासून १०० मीटर परिघात तंबाखू विक्रीस बंदी आहे. तसेच शाळेच्या प्रवेशद्वारावर ‘तंबाखूमुक्त शाळा - या शाळेच्या १०० यार्ड परिसरात सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने विकण्यास बंदी आहे. धूम्रपान केल्यास २०० रुपये दंड आकारला जाईल.’ असा फलक लावणे अनिवार्य आहे. तसेच शाळेच्या प्रवेशद्वाराच्या आत प्रत्येक मजल्यावर लाल रंगाचा लोगो लावणे बंधनकारक केले आहे.

शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. अंमलबजावणीसाठी होणारे प्रयत्न स्तुत्य आहेत. सुसंस्कृत, व्यसनमुक्त पिढी घडू शकेल. अरुणमांडळकर, सेवानिवृत्त शिक्षक

पिढी घडण्यास मदत होणार,शिक्षकांवर असेल लक्ष
शाळेच्याआवारात किंवा वर्गात शिक्षक कर्मचारीवर्ग तंबाखू, तंबाखूयुक्त पान, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ खात असल्यास त्याचा परिणाम वदि्यार्थ्यांच्या मनावर होतो. वदि्यार्थी त्याकडे आकर्षित होऊ शकतात. म्हणून शिक्षक कर्मचा-यांनी शाळांच्या आवारात तंबाखू तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये, असेही शासनाने काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

घोषणापत्र द्यावे लागणार
‘आवाराततंबाखूजन्य पदार्थांचे सेवन होत नाही. तंबाखूजन्य पदार्थ उपलब्ध नाहीत. आम्ही सिगारेट, बिडीचे अवशेष, तंबाखू खाऊन थुंकणे याबाबतीत शाळेच्या आवारात तपासणी केली असता या गाेष्टी आढळून आल्या नाहीत.’, असे घोषणापत्र जिल्हा शिक्षणाधिका-यांकडे द्यावे लागणार आहे.

अंमलबजावणीवर द्या भर
शैक्षणिकसंस्थांना शासनाच्या परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा लागणार आहे. तुम्हाला कुणी धूम्रपान करताना, तंबाखू खाताना दिसल्यास नाव, पद, दूरध्वनी क्रमांक या विहित नमुन्यात सूचना देण्याचे सूचित केले आहे. प्रत्येक शाळेला समन्वय अधिका-याची नियुक्ती करावी लागणार आहे. अंमलबजावणी केली जात असल्याचा अहवाल १५ दिवसांत शाळांना शासनाकडे द्यावा लागणार आहे.