आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान तंत्रज्ञान दिन विशेष: मुलांमधील संशोधन वृत्ती पालकांनी सतत जोपासावी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पालकांनी मुलांमधील संशोधनात्मक वृत्ती, कुतूहल यांना डावलू नये. त्यांना नेहमी प्रोत्साहित करत रहावे. त्यामुळे मुले विचार करण्यास सुरुवात करतात. परिणामी ते विज्ञानाशी अधिक जुळले जातात. तसेच मुलांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी आता पालकांनीच पुढाकार घेण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे मत जळगावातील विज्ञान मार्गदर्शकांनी विज्ञान तंत्रज्ञानदिनाच्या पूर्वसंध्येला ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.
प्रत्येक घरातील मुलगा हा अगोदर शास्त्रज्ञच असतो. त्यामुळे त्यांना विज्ञानाच्या कुतुहलापासून दूर करू नका, असे शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांनी एका भाषणात म्हटले आहे. त्यानुसार जळगावातही अनेक संस्था या विज्ञान दृष्टिकोन समाजात वाढीस लागण्यासाठी तसेच समज-गैरसमज दूर करण्यासाठी कार्य करीत आहेत. विद्यार्थी पालकांनी काय करायला हवे, तसेच जळगावातही बालवैज्ञानिक कसे तयार होताय, याविषयी ‘दिव्य मराठी’ने टाकलेला हा प्रकाश.
शहरातील अनेक शाळांमधील विज्ञान मंडळांतर्फे कार्यक्रम
शहरातील अनेक शाळेत विज्ञान मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून विज्ञानाशी जुळलेले अनेक कार्यक्रम, स्पर्धा, विज्ञान महोत्सव आणि विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. त्यामुळे मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होऊन त्यांच्यातील प्रयाेगशीलता बाहेर येऊन वैज्ञानिक दृष्टीकोन जपासला जातो. तसेच विज्ञान प्रदर्शन हे तालुका आणि जिल्हास्तरावरही शाळांमध्ये घेतले जातात. त्यात सादर झालेल्या उत्कृष्ट वैज्ञानिक प्रयोगांना गौरवण्यात येते.

मराठी विज्ञान परिषद
मुलगी वयात येताना आणि मुलगा वयात येताना, अशा दोन विषयांवर परिषदेतर्फे कार्यक्रम राबवले जातात. मुलांना विज्ञानाचे प्रयोग करून दाखवून त्यांचे शिबिरे घेण्याचेही काम त्यांच्यातर्फे केले जाते. टिव्ही नक्की काय आहे, मग त्याची उकल करून त्यांना पूर्ण पणे सखोल ज्ञान देण्यासारखे प्रत्येक गोष्टीत ते सांगत असतात.
महिलांनीही विज्ञान समजून घ्यावे
चमत्कारबाबा बुवाबाजीचे प्रात्यक्षिक करून दाखवतात. ते जे काही करतात, ते कसे विज्ञानाशी जुळले आहे. हेही मुलांना सांगितले जाते. २०१४ साली शाळांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनतर्फे जवळपास ६०-७० कार्यक्रम घेण्यात आले. पालकांनी विशेष करून स्त्रियांनी विज्ञानाचा दृष्टिकोन समजायला हवा. जेणेकरून मुलांमध्येही ते रुजेल.
- डी.एस.कट्यारे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती
मुलांना प्रात्यक्षिक करु द्या
मुलांमध्येजर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायचा असेल तर त्यांना प्रात्यक्षिक, कृती करू द्यायला हवी. ते टीव्ही पाहत असतील तर त्यांना पाहू द्या, एखादी वस्तू घेऊन उघडत असतील तर उघडू द्या. त्यामुळे ते क्रियाशील हाेतात. त्यांची जाणून घ्यायची वृत्ती वाढत असते.
- दीपक तांबोळी, मराठी विज्ञान परिषद
मुलांच्या प्रश्नांना त्रास समजू नये
मुले जे काही करतात, प्रश्न विचारतात, त्यांच्या या प्रश्नांना त्रास समजू नये. पालक मुलांच्या कुतूहलाला दाबतात. प्रश्न विचारले तर त्यांना बोलतात. एखादी गोष्ट त्यांना वारंवार सांगतात पण तोच वेळ जर काही गोष्टी समजावण्यासाठी दिला तर मुलांच्या भविष्यासाठी कामात येईल. मुलांमधील जर जाणून घ्यायची वृत्तीच तुम्ही संपवली तर मग किती पण महागडे क्लास लावा, त्याचा उपयोग होणार नाही.
- महेश गोरडे, कुतूहल फाउंडेशन
संडे सायन्स स्कूलतर्फे बालवैज्ञानिक
कुतूहल फाउंडेशनतर्फे अनेक बालवैज्ञानिकांची निर्मिती केली जात आहे. यामध्ये मुलांना प्रत्यक्षात प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. त्यांच्या संडे सायन्स स्कूलतर्फे अनेक प्रयोग मुलांनी साकारले आहेत. आतापर्यंत अनेक शिबिरे, कोर्स यांच्यामार्फत सुमारे हजार विद्यार्थ्यांना त्यांनी विज्ञानाशी प्रत्यक्षात जोडले आहे. ज्युनियर केजीपासून ते दहावीपर्यंत महाविद्यालयीन तरुणसुद्धा यात सहभागी होतात. फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा कृतीतून काम केले जाते. आतापर्यंत ७०० कार्यक्रम त्यांच्यातर्फे घेण्यात आले आहेत. यात किचनपासून सायन्स पुस्तकांतील काही प्रयोग, अंतराळपासून ते शरीराच्या आरोग्यापर्यंत काम करतात.
बातम्या आणखी आहेत...