आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scientist Dr.jayant Naralikar's Speech At Jalgaon

भास्कराचार्यांसारखे शिक्षक हवे- शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-खगोलशास्त्राचा अभ्यास करू इच्छिणार्‍यांना भौतिकशास्त्र आणि गणिताची गोडी असली पाहिजे. तरच या क्षेत्रात मनापासून काम करता येईल. तसेच प्रश्‍न उपस्थित करणार्‍या आणि त्यांची उत्तरे देणार्‍या भास्कराचार्यांसारख्या शिक्षकांची आज गरज आहे, असे मत शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. दरम्यान, उद्घाटनावरून डॉ.नारळीकर यांनी नाराजी व्यक्त केली.

गणितज्ञ भास्कराचार्य यांच्या नवव्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त मराठी विज्ञान परिषद व डॉ.जी.डी.बेंडाळे महाविद्यालयातर्फे लेवा बोर्डिंग येथे रविवारी कार्यक्रम झाला. माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी ‘भास्कराचार्यांचे चरित्र, गणित, खगोलशास्त्र’ या विषयावर डॉ.नारळीकरांचे व्याख्यान झाले.

डॉ.नारळीकर म्हणाले की, सुवर्णयुगातील शेवटचा मणी म्हणून भास्कराचार्य यांचे नाव घेता येईल. तसेच खगोलशास्त्रातील कामगिरीबद्दलही ते प्रसिद्ध आहेत. खगोलशास्त्र अभ्यासकाला गणित येत नसेल, तर तो मूर्ख अभ्यासक म्हणून ओळखला जाऊ शकतो. अनेक विद्यार्थी खगोलशास्त्रासाठी गणित आवश्यक असते का? असा प्रश्‍न विचारतात. त्यामुळे गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांची आवड असलेल्यांनीच खगोलशास्त्राचा अभ्यास करावा, असेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आजच्या शिक्षकांनीही मुलांसमोर अनेक प्रo्न उपस्थित केले पाहिजे; परंतु त्यांची उत्तरेदेखील त्यांच्याकडे असली पाहिजेत. कारण भास्कराचार्यांनीही हेच केले. ते निष्णात, विद्वानासोबत एक चांगले शिक्षकही होते. तार्‍यांच्या स्फोटाबाबत विदेशी अभ्यासकांनी अनेक दाखले दिले आहेत; मात्र त्यात भास्कराचार्य यांच्या काळातील एकही दाखला सापडत नाही. तसेच पुराणे व शिलालेखांमध्येही तसे दाखले मिळत नाहीत. त्यामुळे याबाबतचे संदर्भ अभ्यासकांनी तपासावेत, असेही डॉ.नारळीकर म्हणाले.

व्यासपीठावर भालचंद्र पाटील, डॉ.एस.एस.राणे, दीपक तांबोळी, अ.पां.देशपांडे, प्रा.अनिल नेमाडे आदी उपस्थित होते. डॉ.जयंत जोशी यांनी प्रास्ताविक, तर प्रा.र्शद्धा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

मी उद्घाटन केले नाही
दरम्यान, भास्कराचार्य यांच्या प्रतिमेस डॉ.जयंत नारळीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून उद्घाटन झाल्याचे संयोजकांनी जाहीर केले. तथापि, मला उद्घाटन अप्रिय असून, भास्कराचार्य यांच्या आदरापोटी मी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यामुळे मी उद्घाटन केले नाही, असा खुलासा डॉ.नारळीकर यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच केला. तसेच येथील भास्कराचार्य यांची प्रतिमादेखील खरी आहे का? असा प्रo्नही उपस्थित केला. तथापि, मला त्यांच्याविषयी आदर असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय ज्या विषयाला प्राधान्य द्यायचे तोच विषय बाजूला सारून अवांतर विषयावर भर दिल्याबाबतही नाराजी व्यक्त करीत त्यांनी मराठी विज्ञान परिषदेला घरचा अहेर दिला.

पाश्चिमात्यांचाही मोठा हातभार
प्रा.मंगला नारळीकर म्हणाल्या की, भास्कराचार्य यांच्याबाबत वस्तुनिष्ठ नोंदीच उपलब्ध नाहीत. कारण गणिताविषयी रस निर्माण करण्यासाठी तार्किक युक्तिवाद महत्त्वाचा असून, तो भास्कराचार्य यांनी मांडला. तथापि, आताच्या बीजगणिताच्या प्रगतीला पाश्चिमात्य देशांचाही मोठा हातभार लागला आहे. कारण अक्षरे धरून गणित मांडण्याची सोपी पद्धत आपल्याला पाश्चिमात्य देशांकडून मिळाली असल्याचे त्या म्हणाल्या.

निबंध स्पध्रेचा निकाल
खुल्या गटात प्रतिभा पाटील- प्रथम, दिवाकर बडगुजर- द्वितीय, नीलेश पाटील- तृतीय. तसेच शालेय गटात सौरभ वाणी- प्रथम, आकाश नरवाडे- द्वितीय, कोमल पाटील- तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीस हर्षल पाटील याला मिळाले.

भास्कराचार्य होते गाढे अभ्यासक
मोहन आपटे यांनी पाटणादेवी येथे भास्कराचार्य यांचा रहिवास असल्याचे अनेक दाखले एलसीडी प्रोजेक्टरद्वारे दिले. ते अनेक विषयांचे अभ्यासक होते. तसेच त्यांच्याएवढे ज्ञान एकही विद्यार्थी करू संपादन शकत नाही. विज्ञान परिषदेने त्यांचा कुठला तरी एक फोटो निश्चित करावा. कारण त्यांच्या वेगवेगळय़ा प्रतिमांविषयी साशंकता असल्याचेही त्यांनी सांगितले.