आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Scientist Dr. Sharad Kale,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पर्यावरणाचे धडे घेतले पण अवलंब नाही : डॉ. काळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- संतांनीपर्यावरणाचा महिमा लिहिला. तसेच शिक्षण घेताना पर्यावरणाच्या कविता आपण गायल्या ख-या, पण त्या प्रत्यक्षात अमलात आणल्या नाहीत. त्यामुळेच पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे, असे मत भाभा अणुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. शरद काळे यांनी व्यक्त केले.
एसएसबीटी बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय ‘फिस्ट’ या व्याख्यानमालेत दुस-या दिवशी शास्त्रज्ञ डॉ. काळे यांनी ‘शाश्वत पर्यावरण’या विषयावर मनोगत व्यक्त केले. सकाळच्या सत्रात निर्लेप अप्लायन्सचे संचालक श्रीराम भोगले यांचे व्याख्यान झाले. सध्या पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याने अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पाणी, वीज यासाठी पैसे मोजावे लागतात. मात्र, आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक श्वास आहे, तो पर्यावरणाने दिला आहे.
निसर्ग हीच आपली खरी संपत्ती आहे. यासाठी निसर्गाची काळजी घेणे हा मानवाकडे एकमेव पर्याय आहे. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून उपाय योजण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे डॉ. काळे यांनी सांगितले. दोन्ही कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी व्ही.आर. फडणीस होते. या वेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. के.एस. वाणी, संचालक शशिकांत कुळकर्णी आदी उपस्थित होते. प्रा. एस. व्ही. ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सारिका पवार यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ.शरद काळे