आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रपुरुषांसह शास्त्रज्ञ वह्यांच्या मुखपृष्ठावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- विद्यार्थ्यांच्या सुट्या आता संपत आल्या असून, बाजारात शैक्षणिक साहित्याची रेलचेल सुरू झाली आहे. मुलांना लागणाऱ्या शैक्षणिक वह्या आणि पुस्तके बाजारात दाखल झाली असून, यंदा वह्यांच्या मुखपृष्ठावर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे वैज्ञानिक, अंतराळवीरांसह संगीतातील वाद्ये आणि प्राण्यांच्या छायाचित्रांचासुद्धा त्यात समावेश आहे.
यंदा मोठ्या प्रमाणावर वह्यांच्या मुखपृष्ठावर राष्ट्रपुरुष वैज्ञानिक आदींची चित्रे वापरली गेली आहेत. मुलांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण व्हावी बुद्धी चौकस व्हावी म्हणून अशा प्रकारच्या वह्या बाजारात आणल्या जात आहेत. मुलांची आवड आकर्षणाचा विचार करून वह्यांची डिझाइन करण्यात आली आहे. तसेच केवळ छायाचित्रेच नव्हे, तर त्या छायाचित्रांची माहितीदेखील आतील पानात खास मुलांसाठी देण्यात आली आहे. १०० पेजेस वही साधारणत ते १० २०० पेजेस वही १२ रुपयांपासून पुढे उपलब्ध आहे.
माहितीसह चित्रे
प्राणी,पक्षी, निसर्गचित्रांसह राज्यांचीदेखील माहिती देण्यात आली आहे. जिराफ, हत्ती, वाघ, सिंह, कोल्हा यासारख्या प्राण्यांसह अनेक पक्ष्यांची माहिती देण्यात आली आहे. उदा. प्राणी कसा आहे, राहतो कुठे, त्याची जात कुठे आढळून येते, अन्न आदी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर आसाम, महाराष्ट्र आदी राज्यांची मुख्य स्थाने आणि राज्याचे नाव मुखपृष्ठावर असून, त्या राज्याची वैशिष्ट्ये, आकार, लोकसंख्येची माहिती काही वह्यांमध्ये देण्यात आली आहे.
वह्यांवर राष्ट्रपुरुष, स्वातंत्र्यवीर आदींच्या प्रतिमा पाहायला मिळत आहेत. त्यात सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, शिवाजी महाराज, लाेकमान्य टिळक, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले आदींच्या प्रतिमांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे वैज्ञानिकांमध्ये कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, एपीजे अब्दुल कलाम आदींचा समावेश आहे.
मुलांसाठी आकर्षण
राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा असलेल्या वह्या सध्याचे आकर्षण आहे. तसेच दैनंदिन जीवनातील उपयोगी अशा चित्रांची माहिती वह्यांच्या मुखपृष्ठावर दिली असून, मुलांसाठी हे आकर्षण ठरते.
रोहित कश्यप, वृंदा बुक डेपो
बातम्या आणखी आहेत...