आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्काऊट-गाइडचे विद्यार्थ्‍यांनी खरी कमाई’तून विद्यार्थ्यांनी जमवले दोन लाख रुपये

9 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
जळगाव- श्रमप्रतिष्ठा व केलेल्या श्रमाचा योग्य तेवढाच मोबदला घ्यावा ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी स्काऊट व गाइडच्या माध्यमातून खरी कमाई केली जाते. 10 डिसेंबरपासून राज्यभरात सेवा महोत्सवांतर्गत विद्यार्थ्यांना खरी कमाईद्वारे श्रमाच्या तत्त्वांची शिकवण दिली जात आहे. गेल्या वर्षी जिल्हाभरातून सुमारे दोन लाख रुपयांची खरी कमाई जमा झाली आहे.
श्रममूल्य रुजवण्याचा प्रयत्न
स्काऊट-गाइडची ही चळवळ देशातच नव्हे तर जगभरात राबवली जात आहे. पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी कब बुलबूल तर आठवी ते दहावीसाठी स्काऊट व गाइडचा उपक्रम सर्वच शाळांमध्ये राबवला जात आहे. 10 डिसेंबर ते 10 जानेवारीपर्यंत सेवा महोत्सव सुरू आहे. शाळा सुटल्यानंतर अथवा सुटीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी समूहाने अथवा वैयक्तिक शक्य असणारे कोणतेही काम मागून ते योग्य प्रकारे पार पाडणे, यानंतर कामाचा मिळणारा मोबदला जमा करण्याचे काम स्काऊट व गाइडचे पथक करतात. विद्यार्थ्यांमधून जमा झालेल्या रकमेतील 30 टक्के रक्कम पथकांना सामूहिक खर्चासाठी, 40 टक्के रक्कम जिल्हा संस्थेच्या इमारत निधीसह विविध उपक्रमांसाठी वापरली तर, 30 टक्‍के रक्कम राज्य शासनाकडे विविध योजनांसाठी उपयोगात आणली जाते.
 • 424 जिल्ह्यात एकूण युनिट
 • 1 लाख 5 हजार सभासद संख्या
 • 8 प्रकारची पदके विद्यार्थ्यांना देतात
 • 7 विद्यार्थी राज्य पुरस्कारास पात्र
 • 3 विद्यार्थी राष्ट्रपती पुरस्कारास पात्र
श्रमाविषयी प्रतिष्ठा निर्माण
खर्‍या कमाईतून विद्यार्थ्यांच्या मनात श्रम जीवनाविषयी प्रतिष्ठा निर्माण होते. तसेच स्वावलंबन शिकण्यासह सत्यकृत्याचे महत्त्वही त्याला कळते. जिल्हाभरातून यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांनी स्काऊट-गाइडला सढळ मदत केल्यास त्याबदल्यात काम द्यावे, जेणेकरून त्या श्रमाचे महत्त्व विद्यार्थी जाणून घेतील. बी.व्ही.पवार, जिल्हा सचिव, भारत स्काउट-गाइड संस्था
ही आहेत कामे
 • खिडक्या-दरवाजांना रंग देणे
 • घराची साफसफाई करणे
 • आजारी, अपंगांची सेवा करणे
 • धान्य निवडणे, दळून आणणे
 • वाहन धुणे, स्वच्छ करणे
 • हस्तकौशल्याने वस्तू विकणे