आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाईच्या रक्तात भिनलंय नाटक, स्थ‌ानिक रंगकर्मींची भावना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- रंगांच्या अनेकछटांनी एकरूप झालेल्या रंगभूमीशी जळगावचे अत्यंत दृढ नाते आहे. ‘रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी सानंद सादर करीत आहोत’, हे शब्द जणू शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचेच. शहरातील गेल्या सुमारे चार पिढ्या रंगभूमिशी जुळलेल्या आहेत, लाइटस‌्, पडदा आणि बेलचा अावाज जळगावकरांना नेहमीच हवाहवासा वाटत आला आहे. नाटकाची हौस आहे. म्हणून नाटक करताेय, असे पूर्वी म्हटले जायचे, अाता मात्र प्रशिक्षणासह शास्त्रशुद्ध नाटकाचा अभ्यास करून अाम्हाला ‘परफेक्ट’ नाटक करायचे अाहे, असे ठरवणाऱ्या तरुणांचा नाट्यक्षेत्रात ‘प्रवेश’ झाला अाहे. जळगावच्या रंगमंचाने अनेक चढ-उतार पाहिले अाहेत. एकंदरीत राज्यातील नाटकांची परिस्थिती पाहता रंगभूमीला अाता चांगले दिवस येऊ लागले अाहेत. अाज शहरासह खान्देशातील तरुण माेठ्या संख्येने नाटकाकडे वळत असून अनेक संस्थादेखील यात उत्स्फूर्तपणे सहभाग नाेंदवत अाहेत. राज्य नाट्य स्पर्धा, पुरुषाेत्तम एकांकिका स्पर्धा, उमवि करंडक, बालनाट्य स्पर्धा, कामगार कल्याण मंडळाच्या एकांकिका स्पर्धा यामुळे तरुण नाटकासाठी एकत्र यायला सुरुवात झाली अाहे. फक्त तात्पुरते नाटक करता अभ्यासपूर्ण नाटक करण्याकडे त्यांचा कल दिसतो आहे.
जळगावात 70 ते 80 या दशकात अत्यंत माेठ्या प्रमाणात नाटकांची रेलचेल पाहायला िमळायची. जळगावात ते समूह सतत नाटक, बालनाट्य, एकांकिका यात सहभागी असायचे. सातत्याने नवनवीन प्रयाेग साकारले जायचे. अगदी थंडीतही बालगंधर्व खुले नाट्यगृहात रात्री ९.३० च्या नाटकाला वाजेपासूनच गर्दी व्हायची. त्या काळी ‘ग्रामीण राज्य नाट्य’ स्पर्धेत िजल्ह्यातून ४० नाटकांचे सादरीकरण व्हायचे. तेव्हा टीव्ही, माेबाइल, इंटरनेट अशी काेणतीही अन्य करमणुकीची साधने नसल्याने तरुण मुलांसाठी नाटकांचाच एकमेव पर्याय उपलब्ध हाेता. मध्यंतरीच्या काळात िसनेमा अन् टी.व्ही.च्या वाढत्या प्रभावामुळे रंगभूमीचे अस्तित्व काहिसे झाकाेळले हाेते, अाता नाटकाला पुन्हा ‘अच्छे दिन’ येवू लागले अाहेत. नवीपिढी मैदानात
नाटकाचेशिक्षण घेतलेले िवद्यार्थी हे शहरात काेणत्या ना काेणत्या माध्यमातून नाटकाशी जुळलेले अाहेत. दिग्दर्शन, नेपथ्य, रंगभूषा सगळ्याच प्रांतात तरुणांचा सहभाग दिसून येताेय. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांची नाटके पाहायला िमळत अाहेत. एकंदरीतच नाट्यक्षेत्रात नव्या पिढीचा वावर वाढताेय. ही पिढी अाता रंगभूमिची सेवा करण्याला सज्ज झाल्याचे दिसत अाहे.
अभ्यासपूर्णसादरीकरणावर भर
नाटककरायचे म्हणून करावे, असे करता ही तरुण पिढी अभ्यासपूर्ण कामाला महत्त्व देताना दिसत अाहे. नाटकाचे रितसर शिक्षण घेऊन अाम्ही नाटक शिकताेय, असे म्हणत काम करत अाहेत. पुस्तकांचे वाचन, माहिती गाेळा करणे, अपडेट राहणे, याकडे त्यांचा कल दिसून येत अाहे. याेग्य शिक्षण घेऊन सायन्स, काॅमर्स, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंटची मुलेदेखील यात सहभागी हाेत अाहेत.
चाळीसगावातमाेफत शिक्षण
तरुणांनाएकत्र अाणण्यासाठी अश्विन खैरनार नावाचा तरुण सध्या चाळीसगाव शहरात ग्रामीण भागातील मुला-मुलींना माेफत नाटकाचे धडे देत अाहे. नाटकासाठी येणारा संपूर्ण खर्च ताे स्वत करताेय. अासपासच्या खेड्यापाड्यातील ३२ मुले सध्या त्याच्याकडेे नाटकाचे प्रशिक्षण घेत अाहेत. गावात नाट्यगृह उपलब्ध नसल्याने मंगल कार्यालयात त्यांना नाटक करावे लागते. कमर्शियल नाटकांचा खर्च खूप जास्त असल्याने अार्थिक गणित जुळत नाही, तरीही मुलांना नाटकाशी जाेडण्याचा हा प्रयत्न अश्विन एकटाच नेटाने करीत अाहे.
बालगंधर्वांचेशहरात वास्तव्य
रंगभूमीचाराजा म्हटल्या जाणाऱ्या बालगंधर्वांचे शालेय शिक्षण जळगावात झाले हाेते. त्यांचे मामा जळगावचे असल्याने ते येथे शिकायला हाेते. त्याच्या रूपाने शहराला नाटकाचा समृद्ध वारसा लाभला अाहे. येथेच त्यांनी सांगीताचेही शिक्षण घेतले. नंतरही त्यांच्या शालेय सुट्या या अाजाेळी म्हणजे जळगावातच जात असत. शहरातील हेमंत म्हाळस यांचे ते जवळचे नातलग हाेते. टकालापाेषक वातावरण पूर्वीलहान मुलांपासून ते माेठ्यांपर्यंत प्रत्येकजण नाटक करायचे. महिलांनाही पुरुष विरहित नाटक करायला परवानगी असायची. ती मजाच वेगळी हाेती. तेव्हा नाटकासाठी अगदी समृद्ध वातावरण हाेते. मी अाजही वयाच्या 81 व्या वर्षी विद्यार्थ्यांचे नाटक बघायला जाते. अशी अाठवण ज्येष्ठ नाट्यकलावंत नाट्यलेखिका निर्मला कानळदेकर यांनी सांगितली.
जळगाव शहराला रंगभूमीची दीर्घ परंपरा आहे. बालगंधर्वांचे आजोळ असलेल्या या भूमीत नाट्यकलेची तन-मन-धनाने उपासना केली जाते. टी.व्ही. इंटरनेटच्या युगात नवी पिढी रंगभूमीचा हा वारसा पुढे नेत आहे. ‘जागतिक रंगभूमीदिनानिमित्त जळगावातील नाट्यसृष्टीचा घेतलेला हा धावता आढावा.
जळगाव शहराला रंगभूमीची दीर्घ परंपरा आहे. बालगंधर्वांचे आजोळ असलेल्या या भूमीत नाट्यकलेची तन-मन-धनाने उपासना केली जाते. टी.व्ही. इंटरनेटच्या युगात नवी पिढी रंगभूमीचा हा वारसा पुढे नेत आहे. ‘जागतिक रंगभूमीदिनानिमित्त जळगावातील नाट्यसृष्टीचा घेतलेला हा धावता आढावा.
शेवटच्या क्षणापर्यंत साथ
रंगभूमीनेमला जगायला शिकवले. तसेच नवी दृष्टी देऊन अात्मचिंतन करायला शिकवले. २५ वर्षांच्या प्रवासात सतत नवीन काही घडत गेल्याने सर्व प्रश्नांवर मात कशी करावी, हेही कळले. संकटांतून पुन्हा उभे राहण्याची जिद्द मिळाली. रंगभूमीने खूप काही दिलेय, त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत रंगभूमीशी जुळलेला राहीन.
हेमंतकुळकर्णी