आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे भरणाऱ्या 350 गाळेधारकांमुळे सर्व गोलाणी मार्केटला लागणार सील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महिनाभरापूर्वी अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून कारवाईचा इशारा मिळालेल्या गाेलाणीतील गाळेधारकांवरील कारवाईचे संकट टळलेले नाही. गुरुवारी जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर यांनी केलेल्या अचानक पाहणीत गाळेधारक अजूनही कचरा करत असल्याने तीन जणांना जागेवरच दंडाची कारवाई करण्यात अाली. पालिकेची जबाबदारी नसतानाही तीन महिन्यांसाठी सफाई केली जात अाहे, असे असतानाही ३५० गाळेधारकांनी पैसे भरल्याने साेमवारनंतर काेणत्याही क्षणी मार्केटमध्ये कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गाेलाणी अर्थात व.वा.व्यापारी संकुलातील अस्वच्छतेच्या प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी जुलै महिन्यात सर्व गाळेधारकांना सीअारपीसी कलम १३३ प्रमाणे मार्केट सील करण्याची नाेटीस दिली हाेती. गाळेधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत कारवाई टाळण्याची मागणी केली. यासाठी पालिकेने तीन महिने स्वच्छता करून द्यावी, गाळेधारक त्यासाठी पैसे देतील, असा निर्णय घेण्यात अाला हाेता. प्रायाेगिक तत्त्वावर तीन महिने पालिकेने जबाबदारी घेतली असून त्यानंतरची सफाई गाळेधारकांनी संयुक्तरीत्या करायची अाहे. तीन महिन्यांसाठी गाेलाणीतील प्रत्येक गाळेधारकाकडून प्रत्येकी ११०० रुपये गाेळा करण्यात येत अाहेत; परंतु असे असतानाही १०९० पैकी सुमारे ३५० गाळेधारकांनी अजूनही पैसे भरले नसल्याने जिल्हाधिकारी राजेनिंबाळकर यांनी गुरुवारी रात्री नाराजी व्यक्त केली. पालिकेची जबाबदारी नसताना गाेलाणी मार्केटची स्वच्छता करण्यात येत अाहे. काेणतीही जबाबदारी घेत नाही मग किमान स्वच्छतेचे पैसे तर जमा करा, अशा शब्दात जिल्हाधिकाऱ्यांनी मार्केटच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले. साेमवारपर्यंत गाळेधारकांनी प्रतिसाद दिल्यास संपूर्ण मार्केट सील करेल, असा इशारा देण्यात अाला.
 
तिघांना केला हजारांचा दंड 
जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी वाजता मार्केटची पाहणी केली. पूर्वीच्या तुलनेत साफसफाई चांगली असली तरी गाळेधारकांची घाण करण्याची सवय काही सुटलेली नाही. ज्या ठिकाणी व्यवसाय करताे त्याच ठिकाणी घाण करणे याेग्य नसतानाही काही गाळेधारकांनी कचरा वऱ्हाड्यात टाकला हाेता. त्यामुळे दाेघा माेबाइल विक्रेत्यांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड करण्यात अाला. तर राजकमल कम्युनिकेशन या दुकानाचा शुभारंभ देखील झालेला नसून त्यांनी दुरुस्ती करताना घाण टाकल्याने त्यांना हजारांचा दंड करण्यात अाला. पैसे तातडीने भरा अन्यथा दुकान सील करण्याचा इशारा देण्यात अाला. 

तीन महिन्यांनंतर गाळेधारकांचीच राहील जबाबदारी 
फुले मार्केटमध्ये साफसफाई हाेऊ शकते. त्या ठिकाणचे गाळेधारक काम करू शकतात मग तुम्ही का करू शकत नाहीत, असा प्रश्न करत गाेलाणीतील गाळेधारकांच्या कार्यपध्दतीबद्दल नाराजी व्यक्त केली. बैठकीत ठरल्याप्रमाणे वागा अन्यथा कारवाईला सामाेरे जा, अशा शब्दात सुनावले. कराराला दाेन महिने पूर्ण हाेत असून तिसऱ्या महिन्यानंतर तुमची जबाबदारी तुम्हीच पार पाडा, अशी सूचना केली. या वेळी जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, अाराेग्याधिकारी डाॅ. विकास पाटील आदी उपस्थित हाेते. 

गाेलाणी मार्केटच्या गच्चीवर जाण्यासाठी असलेल्या पाचही गेटला कुलूप लावले अाहे. त्यामुळे गच्चीवर चुकीचे प्रकार करणाऱ्यांना अाळा बसणार अाहे. अापत्कालीन परिस्थिती उद‌्भवल्यास नागरिकांना गच्चीवर जाण्यासाठी महापालिकेच्या अाराेग्य बांधकाम विभागासाेबतच अग्निशमन विभाग मंगला बारी यांच्या फुलांच्या दुकानात चाव्या ठेवण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. 
बातम्या आणखी आहेत...