आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीलबंद पाणी उत्पादक नियम बसवताय धाब्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सीलबंद पाणी विक्री करण्यासाठी ‘बीअायएस’ (ब्युराे अाॅफ इंडियन स्टॅडर्ड) कायद्यांतर्गत प्रत्येक उत्पादकाला पाणी तपासणी प्रयाेगशाळा अाणि तंत्रज्ञ ठेवणे बंधनकारक असते. मात्र, पाणी उत्पादकांकडून कायदेशीर तांत्रिक बाबींची पूर्तता व्हावी, म्हणून केवळ स्वाक्षरी करण्यासाठीच तंत्रज्ञाची नियुक्ती केले जात असल्याची धक्कादायक माहिती समाेर येत अाहे.

पाणी पाऊच, पाणी बाॅटल, जार उत्पादनाचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बीअायएसची परवानगी घेणे बंधनकारक अाहे. ही परवानगी देताना संबंधित उत्पादकास नियमानुसार पाण्याचे नमुने तपासण्यासाठी अद्ययावत प्रयाेगशाळा अाणि तंत्रज्ञ (मायक्राे बायाेलाॅजिस्ट) नियुक्त करणे अनिवार्य असते. मात्र, पाणी पाऊच, बाॅटल किंवा सीलबंद जार यांची मागणी पावसाळा अाणि हिवाळ्यात अत्यंत कमी हाेते. त्यामुळे या दिवसांत नियुक्त केलेल्या तंत्रज्ञाचा पगार देणे अडचणीचे ठरते.
बीअायएसच्या नियमांचे पालन करण्यासह कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी कागदाेपत्री मायक्राे बायाेलाॅजिस्ट नियुक्त दाखवून काम भागवले जात असल्याची धक्कादायक माहिती समाेर येत अाहे. यासंदर्भात बीअायएस तसेच अन्न अाैषध विभागाकडून तपासणी झाल्यास हे प्रकार उघडकीस येऊ शकतात.

तक्रार प्राप्त झाल्यास चाैकशी

एखाद्या कामगाराला वेतन मिळाले नसल्यास हा भाग कामगार कायद्यात माेडला जाताे. मात्र, अन्नपदार्थ उत्पादन प्रक्रियेत कार्यरत जबाबदार व्यक्ती नसताना त्याच्या स्वाक्षरीचा गैरवापर हाेत असल्यास हे प्रकरण गंभीर अाहे. यासंदर्भात अापल्याकडे तक्रार प्राप्त झाल्यास चाैकशी करून याेग्य ती कारवाई करण्यात येईल. बी.यू.पाटील,सहायक अायुक्त, अन्न अाैषध प्रशासन

कायद्यात अशी अाहे तरतूद

बीअायएसच्या नियमानुसार पाणी उत्पादकांना काही नियम ठरवून देण्यात अाले अाहेत. प्रत्येक बॅचसाठी घेतलेल्या पाण्यातील घटक अाणि प्रक्रियेनंतर असलेले घटक यांची तंत्रज्ञांमार्फत तपासणी करावी लागते. तपासणीत अाढळून येणाऱ्या घटकांच्या नाेंदी अद्ययावत ठेवण्यासह बीअायएसला कळवावे लागते.
तपासणी तज्ज्ञ नियुक्त नसल्याचे किंवा प्रयाेगशाळेत नियमांचे पालन हाेत नसल्याचे अाढळून उत्पादकाला नाेटीस बजावून म्हणणे मागवणे, दंडात्मक किंवा प्रकरणाचे गांर्भीय पाहून परवाना निलंबन, अशा प्रकारे कायद्यात तरतूद अाहे. अॅड.ललित बरडिया
काम साेडल्यावरही बनावट स्वाक्षरीचा संशय

यशदीपअॅक्वाप्लस प्राॅडक्ट कंपनीतून सप्टेंबर २०१३ राेजी मी काम साेडले हाेते. त्यानंतर माझा थकित पगार देण्यास मालकाकडून टाळाटाळ सुरू अाहे. यासंदर्भात सहायक कामगार अायुक्तांकडे तक्रार केली अाहे. तसेच काम साेडल्यावरही बीअायएसला पाणी तपासणीचे अहवाल पाठवताना संबंधित मालकाकडून माझ्या नावाचा बनावट स्वाक्षरीचा गैरवापर झाल्याचा दाट संशय अाहे. याप्रकरणी बीअायएसकडे तक्रार केली असून लवकरच अन्न अाैषध प्रशासनाकडेही तक्रार करणार असल्याचे मायक्राे बायाेलाॅजिस्ट किशाेर माने यांनी म्हटले अाहे. यासंदर्भात कंपनीचे तत्कालीन संचालक विजय नेरकरांशी संपर्क साधला असता, ताे हाेऊ शकला नाही.