आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नरभक्षक बिबट्याचा मंत्री गिरीश महाजनांनी बंदूक घेऊन झुडपात घेतला शोध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव- तालुक्यात ५ महिन्यांत नरभक्षक बिबट्याने ५ बळी घेतले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत असताना एका नाल्यात बिबट्या दिसल्याची वार्ता धडकली. नंतर ते वन विभागाच्या पथकासाेबत शेतात पायी चालले. ते स्वत: नाल्यात उतरले. एका झुडपासमाेर पिस्तूल राेखून उभे राहिले. मात्र, बिबट्याने तेथून धूम ठाेकलेली हाेती.

 

वरखेडे शिवारात १३ नाेव्हेंबर राेजी कापूस वेचणाऱ्या दिपाली जगताप या महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार मारले हाेते. त्यानंतर २६ नाेव्हेंबर राेजी वरखेडे शिवारातच कापूस वेचणाऱ्या सुसाबाई भील नामक महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामस्थ अतिशय संतप्त झाले हाेते. या महिलेचा मृतदेहच थेट पाेलिस ठाण्यात अाणून बिबट्याला ठार मारण्याचे अादेश काढावे, अशी मागणी केली. त्यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विकास खर्गे,  वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य संरक्षक ए.के. मिश्रा यांच्याशी चर्चा करून बिबट्याला ठार मारण्याचे अादेश द्यावे, अशी अाग्रही मागणी केली हाेती. 


दरम्यान, बिबट्याला ठार मारण्याचे अादेश साेमवारी सायंकाळी मिळाले. अाता नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. बंदुकीच्या गाेळीने एखाद्यावेळी शाेध माेहिमेदरम्यान गर्दी करणाऱ्या एखाद्यास इजा पाेहाेचू शकते. समाेर बिबट्या दिसताेय, परंतु, त्याच्या मागे ग्रामस्थ बघत असले तर अशावेळेस परिस्थिती असूनही बिबट्याच्या दिशेने गाेळी झाडता येत नाही. तसेच गर्दीने गाेंगाट हाेऊन बिबट्या निसटू शकताे, असे मुख्य वनसंरक्षक अादर्श रेड्डी यांनी सांगितले.

 

शाॅर्प शुटर तैनात करणार
बिबट्याला ठार मारण्याचे अादेश अाल्यानंतर वरखेडे, तिरपाेळे, उंबरखेडे शिवारात किमान सहा ते सात शाॅर्प शुटर तैनात करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय माेेरे यांनी सांगितले. याशिवाय पाेलिसांचीही मदत घेतली जाईल. बुलडाणा, अमरावती येथून वन विभागाची अतिरीक्त टीम सायंकाळी बिबट्याच्या शाेधासाठी पाेेहाेचले अाहेत.

बातम्या आणखी आहेत...