आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Search Strategy Through A Combination Of Unauthorized Hydrant In The City

अनधिकृत नळांची रक्कम घरपट्टीत समाविष्‍ट करण्‍याच्‍या महापौरांच्या सूचना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील अनधिकृत नळ संयोजन शोध मोहीम पूर्ण झाली आहे. मात्र, नियमित करण्यासाठी काही नागरिक टाळाटाळ करीत आहेत. पैसे देण्यास संबंधित टाळाटाळ करणार्‍यांच्या घरपट्टीत ती रक्कम समाविष्ट करण्याच्या सूचना उपमहापौर सुनील महाजन यांनी दिल्या आहेत.
महापौर राखी सोनवणे, उपमहापौर महाजन यांनी शनिवारी पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली. या वेळी नगरसेवक नितीन बरडे, संजय कोल्हे, पाणीपुरवठा विभागप्रमुख डी. एस. खडके आदी उपस्थित होते. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना असलेल्या अडचणींची माहिती या वेळी जाणून घेण्यात आली. कमी दाबाने व कुठल्याही वेळेत पाणी मिळत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याकडे या वेळी महापौरांनी लक्ष वेधले. नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नका, अशा सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या. काव्यर}ावली चौकात व्हॉल्व्ह बदललेले नाहीत. तांबापुरा परिसरात पाणीपुरवठा करता येण्यासारखा जलकुंभ तयार आहे. मात्र, पाइपलाइन जोडणी केलेली नसल्याने निरुपयोगी आहे. यासाठी 10 लाख खर्च अपेक्षित असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.
नळ संयोजन नियमित करा
महापालिका हद्दीतील प्रशासनाकडील नोंदीनुसार एकूण 62 हजार नळ संयोजने आहेत. या व्यतिरिक्त किमान एक हजार अनधिकृत नळ संयोजने असल्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा विभागाच्या प्रत्येक युनिट अभियंत्यांनी अनधिकृत नळ संयोजन नियमित करण्याची प्रक्रिया करावी. नियमित संयोजन करण्यासाठी दंडात्मक रक्कम देण्यास नकार देणार्‍यांच्या घरपट्टीत ही रक्कम समाविष्ट करून देण्याच्या सूचना उपमहापौर महाजन यांनी दिल्या.