आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिकिटासाठी मनसे, राष्ट्रवादीत रस्सीखेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोरा - पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेने जिल्हाप्रमुख किशोर पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून, राष्ट्रवादी व मनसेत तिकिटासाठी रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार दिलीप वाघ व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ.अस्मिता पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

५० वर्षांच्या कार्यकाळात भडगाव तालुक्याला विधानसभेत एकदाच प्रतिनिधित्व मिळाल्याने याच तालुक्यातून उमेदवारी निश्चित व्हावी, या मागणीनेही जोर धरला आहे. दुसरीकडे ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यास कॉंग्रेसमधून बंडखोरी होण्याची भीती पक्षश्रेष्ठींना असून, तिकिटासाठी इच्छुकांच्या मुंबईच्या वाऱ्या सुरू आहेत. भडगाव येथे झालेल्या निर्धार मेळाव्यात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ.उत्तमराव महाजन यांनी ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यास बंडखोरी करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. तसेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू केली होती.
भडगाव येथे पक्षविरहित झालेल्या निर्धार मेळाव्यात याच तालुक्याला विधानसभेत प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी करण्यात आली. मात्र, तिकिटासाठीच्या इच्छुकांनी निरनिराळे कार्यक्रम घेऊन मतदारांसमोर आपल्या कामाचे व उमेदवारीचे प्रेझेंटेशन केले आहे.