आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण; तापमान घटले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरासह जिल्ह्यात गुरुवारी अवकाळी पाऊस झाल्यामुळे तापमानात ते अंशांने घटले अाहे. शुक्रवारी शहरात ४०.८ अंश तापमानाची नाेंद करण्यात अाली. गुरुवारप्रमाणे शुक्रवारीदेखील ढगाळ वातावरण कायम हाेते. १० मेपर्यंत वातावरण असेच राहणार असून शनिवारी गारपिटीचा तर त्यानंतर अवकाळी पावसाचा अंदाज अाहे.

गेल्या अाठवड्यापासून राज्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने हजेरी लावली अाहे. त्यामुळे वातावरण ढगाळ हाेऊन तापमान कमी झाले अाहे. शुक्रवारी ब्रम्हपुरी येथे राज्यातील सर्वाधिक ४२.४ अंश तापमानाची नाेंद करण्यात अाली अाहे. विदर्भात ४५ अंशांपुढे गेलेला पारा अाता ४२ अंशांपर्यंत तर जळगावात ४४ अंशांपर्यंत गेलेला पारा ४० अंशांपर्यंत खाली अाला अाहे. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उकाडा कमी जाणवत होता. गुरुवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. शुक्रवारीदेखील दुपारी ३.३० वाजेनंतर ढगाळ वातावरण तयार झाले. मे राेजी विदर्भ, मराठवाडा अाणि उत्तर, मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता अाहे. मध्य महाराष्ट्रात १२ मेपर्यंत वातावरण ढगाळ राहील. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस अपेक्षित असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला अाहे.
बातम्या आणखी आहेत...