आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळमध्‍ये महिनाभरात दुसऱ्यांदा गाेळीबार; बंदाेबस्तासाठी अारसीपी प्लाटून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: गाेळीबार झालेल्या बसमधील अासनांची पाहणी करताना पाेलिसांचे पथक.
भुसावळ - शहरातील मल्ल माेहन बारसेंच्या खुनातील अाराेपी नट्टू चावरिया गाेपाळ शिंदे या दाेघांना धुळे कारागृहातून भुसावळ न्यायालयात बुधवारी हजर करण्यासाठी बसने अाणले जात हाेते. मात्र, नाहाटा चाैफुलीजवळ बस थांबली असताना नट्टू चावरियावर हल्लेखाेराने गाेळीबार केला. मनमाड-शेगाव बसमध्ये (एम.एच. ४०८३) दुपारी २.१५ वाजता ही घटना घडली. महिनाभरात दुसऱ्यांदा गाेळीबार झाल्याने शहर हादरले अाहे.

भुसावळात जखमी चावरियावर प्राथमिक उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात अाले. मात्र, तेथेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पाेलिस सूत्रांनी दिली. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर बस थेट बाजारपेठ पाेलिस ठाण्यासमाेर उभी करण्यात अाल्याने बघ्यांनी प्रचंड गर्दी केली. लाेखंडी पुलापासून ते वसंत टाॅकीजपर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक दुपारी २.१५ ते २.३५ वाजेपर्यंत ठप्प झाली. शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने गर्दी पांगवून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, या घटनेमुळे शहरात तणाव अफवा पसरू नये, म्हणून वर्दळीच्या जामनेर राेडवर संध्याकाळी वाजेपासून अतिरिक्त पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात अाला अाहे. वरिष्ठांनी वेळावेळी परिस्थितीचा अाढावा घेऊन मार्गदर्श सूचना दिल्या.

जिल्हा पाेलिस अधीक्षक तळ ठाेकून
गाेळीबाराच्याघटनेला माेहन बारसे खून प्रकरणाची किनार असल्याने जिल्हा पाेलिस अधीक्षक जालिंदर सुपेकर हे संध्याकाळी वाजेपासून भुसावळात तळ ठाेकून अाहेत. अपर पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, भुसावळचे डीवायएसपी राेहिदास पवार, मुक्ताईनगरचे डीवायएसपी अशाेक थाेरात, बाजारपेठ पाेलिस ठाण्याचे निरीक्षक किसन नजनपाटील, शहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब केदारे, बाळासाहेब गायधनी, सहायक पाेलिस निरीक्षक मनाेज पवार, एम.एन. मुळूक, उपनिरीक्षक रामलाल साठे यांनी जामनेर राेडवर गस्त सुरू केली अाहे. दरम्यान, गाेळीबार करणारा संशयित अमित नारायणसिंग परिहार (नागसेन काॅलनी, कंडारी, भुसावळ) त्याचा साथीदार सागर मदन बारसे (डाेंगरसांगवी, ता. यावल) या दाेघांच्या सातपुड्यातील गारबर्डी धरण परिसरात मुसक्या अावळल्या. त्यानंतर त्यांना जळगाव एलसीबीचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने रात्री वाजता बाजारपेठ पाेलिस ठाण्यात अाणले.

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तूल : भुसावळ येथील बाजारपेठ पाेलिसांनी अापल्या कार्यक्षेत्रात सन २०१० ते २०१५ या पाच वर्षांच्या काळात नऊ गावठी पिस्तूल जप्त केल्या आहेत. त्यात २०१० २०११मध्ये प्रत्येकी एक तर २०१५मध्ये सात पिस्तूल जप्त झाल्या अाहेत. लाेहमार्ग पाेलिसांनीही गेल्या अाठ वर्षांत अाठ गावठी पिस्तूल काडतुसांसह पकडल्या अाहेत. चाेपडा तालुक्यापासून जवळच असलेल्या सातपुड्यातील उमर्टी बऱ्हाणपूर जिल्ह्यातील खकनार तालुक्यातील पचाेरी येथून गावठी पिस्तुलांची शहरात तस्करी हाेत असल्याचा अंदाज अाहे.

दाेन जणांचे एमपीडीएचे प्रस्ताव : बाजारपेठपाेलिस ठाण्यात जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी रात्री वाजता पत्रकार परिषद घेऊन गुन्ह्याची माहिती दिली. दाेन संशयितांना घटना घडल्यापासून सहा तासांच्या अात अटक करण्यात अाले अाहे. दाेघांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची नसली तरी त्यांच्या संदर्भात कसून माहिती घेतली जात अाहे. गाेळीबारानंतर नट्टू चावरियासाेबत असलेल्या पाेलिसांनी फायरिंग केली असती तर बसमधील निष्पाप प्रवाशांचा बळी गेला असता, असेही डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी या पत्रकार परिषदेत अावर्जून नमूद केले.
शहरातील नागरिक भयभीत
अतिरिक्तजिल्हा सत्र न्यायालयासमाेर १७ डिसेंबर २०१५ राेजी मिथून बारसेने नंदू चावरिया, विनाेद चावरिया या दाेघांवर गाेळीबार केला हाेता, त्यात नंदू चावरियाचा मृत्यू झाला हाेता. त्यानंतर १३ जानेवारी राेजी नट्टू चावरियावर बसमध्ये गाेळीबार झाल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. महिनाभरात दुसऱ्यांदा गाेळीबाराची घटना घडल्याने संपूर्ण शहरातील नागरिक भयभीत झाले अाहेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट झाला असून पाेलिसांनी अाता शस्त्र तस्करीचे मूळ शाेधून वाॅश अाऊट माेहीम राबवण्याशिवाय गत्यंतर नाही.