आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या कामगाराचाही मृत्यू; नातेवाईक संतप्त, ‘गीतांजली’ व्यवस्थापन नमले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रकाश तिवनकरांचा मृत्यू झाल्यानंतर अाक्राेश करताना त्यांचा भाऊ. - Divya Marathi
प्रकाश तिवनकरांचा मृत्यू झाल्यानंतर अाक्राेश करताना त्यांचा भाऊ.
जळगाव - पाइप लालागलेल्या गळतीमुळे केमिकल पडून जखमी झालेल्या गीतांजली केमिकल्स कंपनीच्या दुसऱ्या कामगाराचाही बुधवारी उत्तररात्री मृत्यू झाला. या कामगारावर एका खासगी रुग्णालयात सात दिवसांपासून उपचार सुरू होते. कामगाराच्या मृत्यूनंतर गुरुवारी सकाळी रुग्णालयात भेटीसाठी आलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कामगाराच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. नातेवाइकांच्या रोषासमोर कंपनी व्यवस्थापन नमले.
 
कामगार पत्नीला पेन्शन, त्याच्या थोरल्या मुलास नोकरी देण्याचे लेखी आश्वासन आणि अंत्यसंस्कार विधीसाठी १० हजार रुपये रोख देण्याचे कंपनी व्यवस्थापनाने मान्य केल्यानंतरच नातेवाइकांनी कामगाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिलमध्ये हलवण्यास होकार दिला.
 
प्रकाश बळीराम तिवनकर ( वय ५०, रा.रामेश्वर कॉलनी) असे मृत कामगाराचे नाव आहे. गत सप्ताहात २६ ऑक्टोबर रोजी आैद्योगिक वसाहतीमधील गीतांजली केमिकल कंपनीत पाइपला तडा गेल्याने केमिकलची गळती होऊन दोन कामगार ६० टक्के भाजले होते. त्यापैकी सुनील चिंतामण पाटील (वय २४)या तरुण कामगाराचा दोन दिवसांनी २८ ऑक्टोबर रोजी एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. कंपनीच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याने संतप्त नातेवाइकांनी व्यवस्थापनाला जाब विचारला होता. त्या वेळी कंपनी परिसरातही तणाव निर्माण झाला होता.
 
सुनील याच्या नातेवाइकांना मदत देण्याचे आश्वासन कंपनीच्या व्यवस्थापनाने दिल्यानंतर तणाव निवळला होता. दरम्यान, दुसरे गंभीर जखमी कामगार प्रकाश तिवनकर यांच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते; परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेर सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर बुधवारी नोव्हेंबर रोजी रात्री वाजून ४० मिनिटांनी तिवनकर यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबाबत नातेवाइकांनी गीतांजली केमिकलच्या व्यवस्थापनाला माहिती दिली. त्यानंतर वाजता कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जे.वाय.पाटील, लेखा विभाग प्रमुख परेश झंवर यांनी रुग्णालय गाठले. त्या वेळेस नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. तिवनकर यांच्या पत्नीला निवृत्ती वेतन आणि त्यांच्या दाेन मुलांना कायमस्वरूपी नोकरी देण्याची त्यांच्याकडे मागणी केली.
 
पत्नीला पेन्शन एका मुलास नाेकरीचे अाश्वासन
अधिकाऱ्यांनीएका मुलास नोकरी देण्याचे मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, नातेवाईक लेखी आश्वासनावर अडून बसले होते. अखेर तिवनकर यांच्या पत्नीला निवृत्ती वेतन आणि मोठ्या मुलगा केदार यास एप्रिल २० १८ पासून कायमस्वरूपी नोकरी देण्यात येईल, असे मान्य करून कंपनी व्यवस्थापनाने लेखी आश्वासन दिले. तसेच अंत्यसंस्कारासाठी १० हजार रुपयेही दिले. अखेर मृत्यूनंतर सात तासांनी गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नातेवाइकांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला. तिवनकर यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी असा परिवार आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...