आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौणखनिज तस्करी; एक लाख रुपये दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - गौणखनिज तस्करी प्रकरणी तहसीलदार हरीष भामरे यांनी रविवारी सकाळी साकेगावजवळ दोन वाहनांवर कारवाई केली. वाळू आणि मुरुमाची अवैध वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात आली. संबंधितांना एक लाख ४० हजार ८०० रुपये दंड भरण्याची नोटीस तहसीलदारांनी बजावली.

तहसीलदार हरीष भामरे यांनी रविवारी साकेगावजवळ डंपर (क्रमांक एम.एच.१९/झेड-७७४७) आणि ट्रक (क्रमांक-एम.एच.०४ /५१५०)ही दोन वाहने ताब्यात घेतली. दोन्ही वाहने जप्त करून तहसीलच्या आवारात लावण्यात आली. वाळू वाहतूकप्रकरणी संबंधित वाहनधारकास एक लाख ८०० रुपये आणि मुरूम वाहतूकप्रकरणी ४० हजार रुपये दंडाची नोटीस तहसीलदारांनी बजावली आहे.

नियमा नुसार कारवाई
अवैधरीत्या वाळूवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांस एक लाख ८०० रुपये आणि मुरूम वाहतूक करणाऱ्यास ४० हजार रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. दोन्ही वाहनधारकांकडून नियमानुसार दंड वसूल केला जाईल. हरीष भामरे, तहसीलदार,भुसावळ


बातम्या आणखी आहेत...