आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Secret Wealth Law News In Marathi, Divya Marathi

गुप्तधनाचा कायदा अजूनही इंग्रजांच्या जमान्यातलाच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गुप्तधनसापडल्यानंतर त्याच्याविषयी कारवाई करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेला कायदा १३६ वर्षांपूर्वी इंग्रजांच्या काळात बनलेला असून यात भारतीय निखात अिधनियम १८७८प्रमाणे कारवाई केली जाते. यात १९५७मध्ये केवळ एक बदल करून या नियमावलीस मुंबई निखात निधी नियमावली १९५९असे संबाेधण्यात येऊ लागले. त्याचे केवळ नाव बदलले असून निकष नियम अाजही तेच अाहेत. यामुळे असे धन लपवण्याकडेच लाेकांचा कल दिसून येताे. दरम्यान,जिल्ह्यात गेल्या वर्षभरात चार ठिकाणी गुप्तधन अाढळल्याच्या घटना घडल्या अाहेत.
अशी अाहे कारवाईची पद्धत
एखाद्यािठकाणी गुप्तधन सापडल्यानंतर ज्या पाेिलस ठाण्याच्या हद्दीत संबंधित घटनास्थळ असेल, ते पाेिलस गुप्तधन ताब्यात घेऊन जिल्हािधकाऱ्यांकडे जमा करून जिल्हािधकारी जाहीरनामा काढतात. त्याच्या मालकी हक्कासंदर्भात दावा करण्यासाठी १५दिवसांची मुदत असते. त्या कालावधीत जर काेणी याेग्य पुराव्यांसाेबत मालकी हक्क सिद्ध केला तरच संबंधितांच्या ताब्यात सापडलेले गुप्तधन स्वाधिन करण्यात येते. अन्यथा जवळच्या काेशागारातील निखात निधीत ते जमा केले जाते. तसेच त्याचे छायािचत्र पुरातत्व विभागाकडे पाठवण्यात येते, तेथे त्यांना गरज वाटल्यास ते संबंधित धन किंवा वस्तू मागवून घेऊ शकतात.