आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 रुपये घेतल्यावरून सुरक्षारक्षकाला मारहाण, शहर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- वीस रुपयांची नोट घेतल्याच्या कारणावरून एकाने सुरक्षारक्षकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता शिवाजीनगरात घडली. याप्रकरणी सुरक्षारक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी धनराज नथ्थू सोनवणे (वय ५२) हे शिवाजीनगरातील मनपा शाळा क्रमांक १मध्ये सुरक्षारक्षक म्हणून नोकरीस आहेत. सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत आल्यानंतर सोनवणे शाळेबाहेर असलेल्या रवी कोळी यांच्या टपरीवर बार घेण्यासाठी गेले. टपरीजवळ उभे असताना त्या ठिकाणी सिकंदर जक्कार खान (रा.शिवाजीनगर) हा आला. त्यानंतर सोनवणे तेथून पुन्हा शाळेत जायला निघाल्यानंतर सिकंदरने ‘तुम्ही माझे वीस रुपये घेतले; ते परत द्या’ असे म्हणून सोनवणे यांना थांबवले. त्यावर सोनवणेंनी पैसे घेतलेच नसल्याचे सांगितले.
 
या गाेष्टीचा राग आल्याने सिकंदर याने सोनवणे यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ केली. तसेच दुचाकीची चावी सोनवणेंच्या चेहऱ्यावर ओरबाडली. यानंतर सिकंदर तेथून पळून गेला. सोनवणे यांनी लागलीच शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...