आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव- आदर्शनगरात 4500 घरांची सुरक्षा 10 रक्षकांच्या भरवशावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आदर्शनगरात रविवारी उघड झालेल्या घरफोडीच्या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेचा प्रo्न ऐरणीवर आला आहे. उच्चभ्रू आदर्शनगरातील 4500 घरांची सुरक्षा फक्त 10 सुरक्षारक्षकांच्या भरवशावर आहे. घरमालकांच्या सुरक्षा नेमण्यातील निष्काळजीपणाचाच फायदा घेत मंगलचंद्र जाजू यांच्या बंगल्यात घरफोडी केली गेली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी चार तपासपथके स्थापन केली असून नऊ संशयितांना ताब्यात घेतले आहे.

गल्लीत एकही सुरक्षारक्षक नाही
आदर्श नगर भागात यापूर्वीदेखील सुरक्षारक्षक नसलेल्या एका केरळी ठेकेदाराच्या घरी चोरट्यांनी अशाच पद्धतीने चोरी केली होती. आदर्शनगरात सर्व उच्चभ्रू लोकांचा रहिवास आहे. त्यातील बहुतांश व्यापारी आणि उद्योजक आहेत, तर काही नोकरदार आहेत. सुमारे 90 टक्के लोकांचे मोठे बंगले या भागात आहेत. त्यातील बरेच बंगले हे दिवसभर बंद असतात. रविवारी ज्या जाजू परिवाराकडे 25 लाखांची चोरी झाल्याचे उघडकीस आले, त्यांच्या बंगल्यावर सुरक्षारक्षकच नव्हता. मात्र, ते ज्या गल्लीत राहतात. त्या डी मार्टच्या मागील बाजूस एकाही बंगल्यावर सुरक्षारक्षक नाहीत. जाजू यांच्या घराच्या पुढील बाजूस असलेल्या अगस्ती अपार्टमेन्टमध्ये एक सुरक्षारक्षक आहे. मात्र तो देखील फक्त त्या अपार्टमेंटपुरता र्मयादित आहे. शेजारी शहा यांचे कार्यालय तर अगदी समोर जंगले यांचा बंगला आहे. बंगल्याच्या मागील बाजूस कुळकर्णी यांचे घर आहे. मात्र, या तिन्हीही बंगल्यांवर सुरक्षारक्षक नाही.

गुरखेही अगदी मोजकेच
आदर्शनगरात रात्रीच्या वेळी फिरस्ते गुरखे नेमलेले असतात. मात्र ते देखील मोजकेच आहेत. त्यांच्याकडे नुसतेच आदर्शनगर नव्हे तर इतरही कॉलन्यांची जबाबदारी आहे. ते फक्त शिटी फुंकत चक्कर मारून निघतात.

सिक्युरिटी नेमणे अगदी सोपे
जळगावातील सिक्युरिटी कंपन्या थोड्या दिवसांसाठीदेखील बंगल्याबाहेर सिक्युरिटी नेमण्यास तयार असतात. जळगावात अनेक सिक्युरिटी एजन्सी काम करतात. त्या पैकी मार्शल सिक्युरिटी सुरक्षा रक्षकांसाठी 12 तासाला 400 रुपये घेते, एसआयएस सिक्युरिटी 12 तासांसाठी 200 रुपये घेते, तर मिडीएटर्स सर्व्हिसेस 50 रुपये घेते.

येथे साधा संपर्क
ताप्तपुरत्या सुरक्षा सेवेसाठी येथे संपर्क साधा : मार्शल सिक्युरिटी 9422292201, एसआयएस सिक्युरिटीज 9545455961, मिडीएटर्स सिक्युरिटी सव्र्हीसेस 9372801811

पोलिसांकडे नोंदच नाही
मोठय़ा व पॉश वसाहतींमध्ये घरांवर असलेले सुरक्षारक्षक व त्याच बरोबर गस्तीवरील सुरक्षारक्षकांची कोणतीही नोंद जिल्हापेठ पोलिसांकडे नाही. एवढेच नाही तर गस्तीसाठी दोन-तीन कॉलन्या मिळून ठेवलेले गुरख्यांची नोंददेखील पोलिसांकडे नाही. या भागात किती लोक राहतात. त्यापैकी किती लोकांचे पॉश व आलिशान बंगले आहेत. याचीदेखील नोंद पोलिसांच्या दप्तरी कोठेही नाही.