आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा संकुलाच्या सुरक्षा सेवा निविदाप्रक्रियेत घोळ; सिक्युरिटी सर्व्हिसेसचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जिल्हा क्रीडा संकुलात चार वर्षांपासून सुरक्षा सेवा पुरविणार्‍या विशाल इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेसने 2013-14 साठी निविदा सादर केली होती. यात कामगार कायद्यास अनुसरून सेवादर सादर केले होते. मात्र, क्रीडा संकुल समितीचे सचिव व क्रीडा संकुलाचे व्यवस्थापकांनी निविदेच्या नियमाप्रमाणे सेवादर नसतानाही विजय सिक्युरिटी सर्व्हिसेसची निविदा मंजूर केली. व्यवस्थापक महाजन यांच्या जवळच्या नातेवाइकाची ही सर्व्हिसेस असल्याचा आरोप करीत न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा विशाल सर्व्हिसेसचे डी. एन. चौधरी यांनी दिला आहे. क्रीडासंकुलाच्या प्रवेशद्वारासमोर 6 जूनपासून सकाळी 11 वाजता उपोषण करण्यात येईल, असे त्यांनी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

चौधरी यांनी पत्रकात नमूद केले आहे, की आम्ही सादर केलेले दर नियमाप्रमाणे सर्वांत कमी असताना क्रीडा संकुल व्यवस्थापकांचे जवळचे नातेवाइक असलेले एजन्सीधारक विजय सिक्युरिटी सर्व्हिसेस यांचे सेवादर टेंडरच्या नियमाप्रमाणे रास्त व योग्य नसताना व ते नियमात बसत नसतानाही त्यांची निविदा मंजूर करण्यात आली. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे. क्रीडा संकुल समितीने निविदांचा फेरविचार करावा व आम्हाला न्याय मिळवून द्यावा.

निविदेबाबत 28 मार्च, 6 मे, 14 मे व 15 मे रोजी क्रीडा संकुलासमोर बाजू मांडूनही त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचाही आरोप चौधरी यांनी केला आहे. त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्यात येईल, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.