आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराेधकांचे नव्हे पक्षातील गद्दारांचेच थाेबाड रंगवा! वाचा खडसे आणखी काय म्हणाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पक्ष संघटन करताना विराेधकांशी लढण्याची मुळीच गरज नाही, पक्षातच गद्दार आहेत. त्यामुळे अाधी त्यांचे थाेबाड रंगवून कार्यकर्त्यांनी घाबरता त्यांच्या ताेंडावर थुंकावे. गद्दारांना साेबत घेऊन निवडणुका लढल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे पक्षाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, पक्षात राहून मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु, मी संपणारा नव्हे तर संपवणारा असल्याचा इशारा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिला. यावेळी संतप्त खडसे समर्थकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वकिली करणाऱ्या संघटनमंत्र्याला भाषण थांबवण्यास भाग पाडले. तसेच खडसेंच्या राजीनाम्यानंतर जळगावात पेढे वाटणाऱ्या शिवसेनेच्या निषेधाचा ठरावही एकमताने करण्यात आला. दरम्यान, बैठकीत खडसे समर्थकांचा सर्व रोष हा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर होता.

भाजपच्या जिल्हा महानगरची एकत्रित बैठक बुधवारी बाबा हरदासराम मंगल कार्यालयात झाली. खडसे यांच्या राजीनाम्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनीच भाजप अाणि मुख्यमंत्र्यांवर जाहीर व्यक्त नाराजी करुन बैठकीचा ताबा घेतला. खडसेंशिवाय दुसऱ्या काेणत्याही विषयावर एेकून घेण्याची तयारी नसलेल्या कार्यकर्त्यांनी संघटनमंत्री रवी भुसारी यांना भाषण थांबवणे भाग पाडले. तुम्ही मुख्यमंत्र्यांची वकिली करू नका, अशा शब्दात कार्यकर्त्यांनी त्यांना सुनावले. संतापलेल्या कार्यकर्त्यांना शांत करताना खडसे यांनी तब्बल तासभर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षात राहून अारडा-अाेरड करणाऱ्यांचा पक्षाने अाधी बंदाेबस्त केला पाहिजे. अनेकांना मी उकिरड्यावरून उचलून पदे दिली, तेच लाेक अाज माझ्याविराेधात कारवाया करीत अाहेत. शिवाजीनगरशी (माजी अामदार सुरेश जैन ) माझा वैयक्तिक वाद नाही. परंतु, पक्ष वाढवण्यासाठी मी अायुष्यात तिकडे पायरी चढलाे नाही. ठरवले असते तर इतरांप्रमाणे मी ही राजकीय सेटिंग करू शकलाे असताे, पण कार्यकर्तेे डाेळ्यांपुढे असल्याने तसे केले नाही. अनेकांना अंगावर घेतले, शेपूट घातले नाही. मी घडवलेल्या लाेकांनीच असे कृत्य केले. त्यांना थाेडीही लाज वाटली नाही, याचे दु:ख असल्याचे ते म्हणाले.
पुढे वाचा..
> पक्षाला प्राधान्य
>अजीब दास्ताँ है ये, कहा शुरू कहा खतम
>नाराजीचा राेख महाजनांच्या दिशेने
>खडसे उवाच...