आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Seed Lone Issue Take In Mantri Mandal Said By Dr.vijaykumar Gavit

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीककर्जाचा मुद्दा मंत्रिमंडळात मांडू - डॉ. विजयकुमार गावित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - रिझर्व्ह बॅँकेच्या निर्बंधामुळे धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतर्फे शेतक-यांना पीककर्ज वाटप बंद करण्यात आले असून, हा मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल. यासंदर्भात शासनाला सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडू, असे आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व फलोत्पादन मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले.
तालुक्यातील कापडणे येथे नुकताच शेतकरी मेळावा घेण्यात आला. त्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी राष्ट्र वादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, म्हाडाचे नाशिक विभाग सभापती किरण शिंदे, जिल्हा परिषदेचे सदस्य किरण पाटील, माजी महापौर भगवान करनकाळ, राष्ट्र वादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव पाटील, तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, राष्ट्र वादी कॉँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संजीवनी सिसोदे, नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यंकटराव पाटील, तालुका उपाध्यक्ष किशोर चौधरी, कार्याध्यक्ष संतोष पाटील, सरचिटणीस सुनील पाटील, डॉ. दिनेश माळी, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष धनंजय कुंवर, कापडणे सरपंच इंदिरा पाटील, देवीदास माळी आदी उपस्थित होते.
मंत्री डॉ. गावित म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विभाग टप्प्याटप्प्याने लवकरच नव्या इमारतीत कार्यान्वित होतील. त्यामुळे तालुक्यातील एकाही रुग्णाला जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज भासणार नाही. रुग्णालयात आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. श्री. कदमबांडे म्हणाले की, केंद्र शासनाच्या एआयबीपी योजनेंतर्गत सुलवाडे-जामफळ-कान्होली उपसा सिंचन योजना मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत. योजनेतून तापीच्या पाण्याचा उपयोग सिंचनासह उद्योग व्यवसायासाठी होणार आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी कृषिमंत्री शरद पवार यांनी स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. श्री. शिंदे म्हणाले की, तालुक्याच्या विकासासाठी सिंचन क्षेत्रात वाढ होणे आवश्यक आहे.
अक्कलपाडा धरणाच्या विस्तारीकरणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी निविदा काढण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद सदस्य पाटील म्हणाले की, तालुक्यात इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या उद्योग व्यवसायांना चालना मिळणार आहे. त्यासाठी 10 हजार हेक्टर जमीन आरक्षित केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी भूमिहीन होणार असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ईश्वर बडगुजर यांनी सूत्रसंचालन केले.