आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिनी राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी चौघांची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मुंबई उपनगर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने अंधेरी (मुंबई) येथे होणाऱ्या तिसऱ्या मिनी राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी जिल्ह्यातील चार जणांची राज्याच्या संघात निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धा अंधेरी येथे ते जूनदरम्यान होणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुला-मुलींचा संघ सहभागी होणार असून २४ राज्यांतील संघही सहभागी राहणार आहेत. या संघास संघटनेचे अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, पी.ई.पाटील, डॉ.प्रदीप तळवेलकर, प्रशांत जगताप, डॉ.सुरज येवतीकर, गोकुळ तांदळे, नितीन पाटील, प्रा.उदय नाईक, त्रिभुवन सिंग, सचिन भोसले, राकेश शेट्टी, एन.डी.पटवाले, चेतन महाडिक यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

मुलींचा संघ : एव्हीएलपिंटो, श्रेया शेट्टी, मालविका निकरांग, सिद्धी यांगवी, रिया टागोर, अवंती चौधरी, सणभावी कदम, मानसी फनसे, निशी लोढा, यशवी यापी, मनस्वी रेडंले, चैत्रवी गुप्ते, इशिता कुलकर्णी, आरोही चव्हाण, अनिशा नाईक. राखीवमध्ये सोनल यादव, प्रिया पाटील अंकिता म्हात्रे यांचा समावेश आहे.
मुलांचा संघ : अस्मितझा, ध्रुव गलैया, धैर्य मुनी, आर्यन देसाई, नील जोसेफ, अथर्व नाईक, मोहनिज काझी, अर्णव देशपांडे, जय पाटील, मंगेश विसपुते, धनंजय चौधरी, सुमुख सोनकुसरे, डेविड जॉन, गोविंद वानखेडे, मंदार गावडे, मानस जोशी, अनिष तावडे, अनिष कुडतरकर, राखीवमध्ये उज्ज्वल चौधरी, अद्यजा बोगावकर, सुदास पाटील.
बातम्या आणखी आहेत...