आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम समिती सभापतीसाठी सत्ताधारी निरुत्साही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - भाजपच्या नगरसेविका तथा बांधकाम सभापती भावना अजय पाटील या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये अपात्र ठरल्या आहेत. यामुळे बांधकाम समिती सभापती निवडीसाठी सोमवारी (दि. २३) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, नवनियुक्त सभापतीसाठी केवळ महिनाभराचा कालावधी मिळणार असल्याने एकाही इच्छुकाचा अर्ज दाखल झाला नाही, परिणामी विशेष सभा रद्द झाली. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार डिसेंबरअखेर नव्याने सर्वच समितींच्या सभापतीची निवड होईल.

भाजपतर्फे नगरसेवकपदी निवडून आलेल्या भावना पाटील यांनी नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार अख्तर पिंजारी यांना मतदान केले होत. या एका मताचा पिंजारी यांना फायदा झाला होता. या उपकारातून उतराई होण्यासाठी त्यांनी भावना पाटील यांची बांधकाम सभापतिपदी वर्णी लावली होती. मात्र, यानंतर भाजपचे गटनेते प्रमोद नेमाडे यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी भावना पाटील यांना अपात्र घोषित केले. यामुळे त्यांच्याकडील बांधकाम समितीचे सभापतीपदही गेले. या रिक्त जागी सभापतींची निवड करण्यासाठी सोमवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी १० ते १२ वाजेदरम्यान अर्ज खरेदी आणि भरण्याची मुदत होती. मात्र, सभापतिपदाची निवड ही अल्पकाळासाठी राहणार असल्याने सत्ताधारी गटाच्या एकाही नगरसेवकाने अर्ज भरला नाही. म्हणून आगामी विशेष सभेची प्रक्रियादेखील पूर्ण होऊ शकली नाही. पालिकांच्या सर्व विषय समितींचा कार्यकाळ डिसेंबरअखेर संपणार आहे. सोमवारच्या सभेत बांधकाम समिती सभापतीची निवड झाली असती, तरी त्यास केवळ एक महिनाच संधी मिळाली असती. हा काळ अत्यल्प असल्याने कोणीही अर्ज भरले नाही.

दरम्यान, येथील नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी अमोल बागुल हे सकाळी वाजताच पालिकेत दाखल झाले होते. त्यांनी निवडीची सर्व प्रशासकीय पूर्तता केली होती. नगरसेवकांना दुपारी वाजता विशेष सभा असल्याचे कळवण्यात अाले होते. मात्र, सभापती पदासाठी अर्ज दाखल झाल्याने पुढील प्रक्रिया होऊ शकणार नसल्याचे जाहीर करण्यात अाले.

निर्धारित वेळेत अर्जच नाही
सभापती निवडीसाठीदुपारी वाजता विशेष सभा जाहीर केली. यापूर्वी दोन तासांच्या कालावधीत अर्ज भरण्याची प्रक्रिया होती. मात्र, निर्धारित वेळेत कोणीही अर्ज भरले नाही. यामुळे पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रश्नच येत नाही. अमोलबागुल, प्रभारी मुख्याधिकारी

आठवड्यात कार्यक्रम जाहीर हाेणार
अागामी२०१६या वर्षांत विषय समिती सभापती निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. साधारणत: येत्या आठवडाभरातच याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश प्राप्त होतील. शहरासह जिल्हाभरातील सर्वच पालिकेच्या विषय समिती सभापतिपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याची माहिती येथील पािलकेच्या सूत्रांनी दिली.

आगामी निवडीत मिळणार संधी
पालिकेच्या विषय समितीची निवड डिसेंबरअखेर होणार आहे. केवळ तीन आठवडे किंवा महिनाभरासाठी निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार होती, म्हणून कुणीच अर्ज भरला नाही. केवळ औपचारिकता पूर्ण झाली. डिसेंबरअखेर होणाऱ्या निवडीत सत्ताधाऱ्यांनाच संधी मिळेल. अख्तर पिंजारी, नगराध्यक्ष