आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Selection Of Jalgaon District Teams For State Swimming Competition

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा; जिल्हा संघ निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जलतरण स्पर्धेच्या मुला, मुलींच्या संघासोबत कांचन चौधरी, फारुख शेख, मनोज शर्मा, राहुल सूर्यवंशी, दीप्ती अनफट, प्रशांत फाळके, हर्षल बोरसे, सुनील चौधरी, अक्षय सोनवणे आदी.)
जळगाव- पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी मुले मुलींच्या जळगाव जिल्हा संघांची निवड सोमवारी करण्यात आली. गीताशंकर जलतरण तलावावर ही निवड चाचणी झाली. या वेळी एकलव्य पुरस्कारप्राप्त कांचन चौधरी, जैन स्पाेर्ट्स अकॅडमीचे समन्वयक फारुख शेख, मनोज शर्मा, राहुल सूर्यवंशी, दीप्ती अनफट, प्रशांत फाळके, हर्षल बोरसे, सुनील चौधरी, अक्षय सोनवणे, ललित सूर्यवंशी अादी उपस्थित होते.
पुणे जिल्हा जलतरण संघटनेतर्फे ४२व्या ज्युनियर अाणि ३२व्या सबज्युनियर राज्य जलतरण अजिंक्यपद स्पर्धेेचे १२ ते १४ जूनदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात ही स्पर्धा होणार असून, या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील मुले मुलींचे संघ सहभागी होणार आहेत. निवड झालेल्या संघांतील खेळाडूंना जैन उद्योगसमूहाचे उपाध्यक्ष अशोक जैन यांच्यातर्फे टी-शर्ट, प्रवास रहिवासाचा खर्च देण्यात आला आहे. तसेच जे पालक स्पर्धेच्या ठिकाणी जाणार आहेत त्यांचीही व्यवस्था केली जाईल.
मुलांचा संघ
विनय चौगुले, ओंकार कुळकर्णी, गतीक पाटील, लोकेश चौधरी, रोशन राजपूत, सागर टेकावडे, गणेश पाटील, सोहम चौधरी लोकेश पाटील. तसेच प्रशिक्षक म्हणून राहुल सूर्यवंशी, तर व्यवस्थापक म्हणून प्रशांत फाळके हर्षल बोरसे यांची निवड करण्यात आली आहे.
मुलींचा संघ
वेदोशी वाणी, पीयुषा जावळे, भक्ती भोळे, कस्तुरी चौगुले, धनश्री जाधव, मानसी राजपूत, दृष्टी सुरतवाला, चार्वी पाटील, राधिका उभाड, भूमी संघवी, निधी पंडित, परिधी करवा. तसेच प्रशिक्षक म्हणून कांचन चौधरी व्यवस्थापक म्हणून दीप्ती अनफट यांची निवड झाली आहे.