आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खेळाडूंचा फायदा: चेस लीग स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेतर्फे चेस लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी खेळाडूंचा आर्थिक फायदाही होणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबईच्या जुहू परिसरातील हॉटेल नोव्होटेल येथे खेळाडूंची बोली लावण्यात आली. यात आंध्र प्रदेशची खेळाडू कोनेरू हम्पी ही सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे.
महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली एमसीएल लीग सीआयएस लीग अशा प्रकारच्या स्पर्धा राबवणारी पहिलीच राज्यसंघटना ठरली आहे. खेळाडूंवर बोली लावण्याप्रसंगी बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद सिनेअभिनेता अामिर खान यांची प्रमुख उपस्थिती होती. संघटनेने राबवलेल्या या उपक्रमाबाबत दोघांनीही गौरवोद्गार काढले. या वेळी व्यासपीठावर अशोक जैन, नितीन करीर, जयराज फाटक, ग्रंॅडमास्टर प्रवीण ठिपसे, अभिजीत कुटे अनिरुद्ध देशपांडे उपस्थित होते.
सहा संघांचा सहभाग
यास्पर्धेत जैन इरिगेशनचा जळगाव बॅटलर्स, मुंबई मुव्हर्स, पुणे अटॅकर्स, अहमदनगर चेकर्स, ठाणे केम्बाटन्ट पुणे ट्रे मास्टर हे सहा संघ भाग घेणार आहेत. या सहा संघांतर्फे खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. या पूर्वी ज्या संघांनी दोन खेळाडू रिटेन केले होते, त्यांना यात सहभागी होता आले नाही. परंतु त्यांना १० टक्के ज्यादा रक्कम देण्यात आली.
असा आहे जळगाव संघ
विदितगुजराथी (ग्रँडमास्टर, महाराष्ट्र), बि. अधिभान (तामिळनाडू), किरण मोहंती (ओरिसा), श्रीनाथ नारायणन (तामिळनाडू), ऋतुजा बक्षी (महाराष्ट्र) आणि जुबेरशहा शेख (महाराष्ट्र)
असे ठरले महागडे खेळाडू
लिलावादरम्यान ग्रँडमास्टर मिळवलेली आंध्र प्रदेशची खेळाडू कोनेरू हम्पी हिला लाख ५२ हजार रुपयांत मुंबई मुव्हर्सने घेतले. त्या पाठोपाठ इंटरनॅशनल मास्टर ओरिसा पद्मती राऊतला पुणे अटॅकर्सने लाख ५० हजार रुपयांत तर महिला ग्रँडमास्टर महाराष्ट्राची इशा करवाडे हिला ठाणे केम्बाटन्टने लाख १४ हजार, विदित गुजराथीला जळगाव बॅटलर्सने लाख ३२ हजार तर तामिळनाडूचा ग्रँडमास्टर बी.आधिभान याला लाख हजार रुपये देऊन रिटेन केले. जळगाव बॅटलर्स संघाची बोली क्रीडा समन्वयक फारुख शेख यांनी लावली. त्यांना मोरेश्वर भागवत, प्रवीण ठाकरे विवेक अळवणी यांनी सहकार्य केले.
बातम्या आणखी आहेत...