आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विक्रेत्यांनी मॅगीची पाकिटे कंपनीकडे परत पाठवली, अन्न औषध प्रशासन सुस्तच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मॅगी नूडल्समध्ये प्रमाणापेक्षा १७ पटींनी जास्त मोनोसोडियम ग्लुटामेट शिसे आढळून आल्याने त्याच्या विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे दुकानांमध्ये असलेला माल जप्त करण्याची मोहीम सर्वत्र राबवली जात आहे. मात्र, शहरात अद्यापपर्यंत अशी कोणतीही कारवाई अन्न औषध प्रशासनाकडून झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, काही विक्रेत्यांनी आपल्याकडील माल कंपनीला स्वत:च परत पाठवला आहे.
गेल्या आठवडाभरापासून मॅगी न्यूडल्सचा विषय चांगलाच गाजत आहे. शासनाने या कंपनीचा विक्री झालेला माल ताब्यात घेण्याची मोहीम सर्वत्र सुरू केली आहे. त्यात पुढाकार घेत शहरातील नामांकित व्यावसायिकांनी आपल्याकडील मॅगी न्यूडल्सचा साठा मुख्य वितरकाकडे पाठवला आहे. शहरासह जिल्ह्यातून मॅगी न्यूडल्सचा माल जप्त करण्यासाठी अन्न आैैषध प्रशासनाला कळवण्यात आले आहे. मात्र, जिल्हा अन्न औषध विभागात सध्या सहायक आयुक्तपद नुकतेच रिक्त झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना येऊनही जप्तीची मोहीम राबवण्यास विभागाने अद्याप सुरुवातही केलेली नाही. याबाबत विभागाचे अन्न औषध निरीक्षक संदीप देवरे यांच्याशी संपर्क साधला असता, अद्याप आम्ही अशी मोहीम सुरू केली नसून, लवकरच सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दीड लाखांचा माल बिग बझारने नाकारला
दरम्यान, शहरातील बिग बझारचे व्यवस्थापक प्रशांत पांडे यांनी मंगळवारी सुमारे दीड लाख रुपयांची मॅगीची ३०० पाकिटे कंपनीच्या मुख्य कार्यालयाकडे पाठवली असल्याची माहिती ‘दिव्य मराठी‘ला दिली. यासह डी-मार्टमधील मॅगीचा संपूर्ण मालही परत केल्याचे व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे किरकोळ किराणा दुकानांमध्ये अन्न औषध प्रशासन िवभागाने मोहीम राबवल्यास मोठ्या प्रमाणात नूडल्सचा माल जप्त होऊ शकेल, असे बोलले जात आहे.