आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन पेटले : अर्धनग्न मोर्चामुळे ‘शक्तीगड’ला जोरदार हादरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - राष्ट्रीय मजदूर सेनेने मंगळवारी दीपनगर केंद्राच्या शक्तीगड कार्यालयावर अर्धनग्न, मशाल मोर्चा काढला. कामगार नेते तथा राष्ट्रीय मजदूर सेनेचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाला प्रशसनातर्फे उपमुख्य अभियंता एल. बी. चौधरी यांनी मागण्यांच्या पूर्ततेबाबत आश्वासन दिले. 
 
दीपनगर प्रकल्पातील कंत्राटी कामगारांना हजार बोनस, एमओडी धोरणामुळे संच वारंवार बंद ठेवण्यात येतात. यामुळे कामगारांच्या कपातीचे धोरण अवलंबले जाते. या कामगारांना महिन्यातून २६ दिवस काम देणे, संच क्रमांक दोनमधील बॉयलर विभागामधील सफाई कर्मचाऱ्यांना कामावर घणे, कंत्राटी कमगारांच्या वेतनात वाढ आदी मागण्यांसाठी राष्ट्रीय मजदूर सेनेने मंगळवारी शक्तीगडवर मोर्चा काढला. आंदोलकांचे निवेदन स्वीकारुन उपमुख्य अभियंता एल. बी. चौधरी यांनी, कामगारांना सात हजार रुपये बोनस आठवड्याभराच्या आत देणे, कंत्राटी कामगारांच्या मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तालुका पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. गजानन चऱ्हाटे, सुनील ठाकूर, दीपक अडकमोल, छोटू निकम, राकेश बग्गन आदी पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
संच कायम सुरू राहावेत : दीपनगर केंद्रातील संच वारंवार एमओडीमुळे बंद होत आहेत. यामुळे कंत्राटी कामगारांना कामावर कायम ठेवण्यासाठी कंत्राटदार तयार होत नाही. दीपनगरातील संच कायम सुरू ठेवावे, अशी मागणीदेखील आंदोलनात करण्यात आली. संच बंद असले तरी कामगारांना महिन्याभरातून किमान २६ दिवस काम मिळावे, या मागणीबाबत मात्र ठोस आश्वासन मिळाले नाही. 
 
गाढव मोर्चा काढू 
- प्रशासनाने दिलेल्या आश्वासना प्रमाणे आठवडाभरात मागण्या मान्य झाल्यास पीआरपी, राष्ट्रीय मजदूर सेना अन्य समविचारी संघटनांच्या माध्यमातून गाढव महामोर्चा तीव्र जनआंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनापूर्वी कामगारांच्या समस्यांवर तोडगा निघावा, ही आमची अपेक्षा आहे.
जगन सोनवणे, प्रदेश महामंत्री 
बातम्या आणखी आहेत...