जळगाव - अब्बुल रज्जाक मलिक पब्लिक लायब्ररीतर्फे ‘उर्दू की तरक्की अाैर खान्देश’ या विषयावर एक दिवसीय परिसंवाद सेमिनारचे इकरा काॅलेज येथे अायाेजन करण्यात अाले हाेते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक तर उद्घाटक म्हणून रेडक्राॅस साेसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, अामदार सुरेश भाेळे, साेहेल अमिर, सलीम इनामदार, जहांगीर खान, अजिज ब्यावली, अशफाक पिंजारी, अासिफ शेख यांची उपस्थिती हाेती. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने झाली. या वेळी कय्युम असर, रशीद कासमी, डाॅ. शकील अमहद, वाहिद इमाम, सज्जाद हैदर यांनी उर्दू भाषा ही कुणा एका धर्माची किंवा एका पंथाची नसून जगातील गाेडवा प्रेम, अादर निर्माण करून बंधुभाव निर्माण करते, असे सांगितले. जय्यान अहमद यांनी सूत्रसंचालन केले. तबरेज असलम यांनी अाभार मानले. कार्यक्रमास इद्रिस शेख, शेख अाकीब, शेख नासीर, युनूस पिंजारी, जुनैद शेख, मुदस्सर शेख यांचे सहकार्य मिळाले. रऊफ शेख यांनी कार्यक्रमाचे अायाेजन केले हाेते.