आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजच्या कवितेत उमटते 1990 नंतरचे प्रतिबिंब; तीन दिवसीय काव्योत्सवात उमटला सूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- आजचा कवितेचा काळ हा 1990 नंतरच्या कालखंडात विखंडित झालेल्या जगण्याचे प्रतिबिंब उमटलेल्या कवितेचा काळ आहे. सर्वसामान्यांचे जीवन आणि कविता यात कोणतीही भिन्नता श्रीकांत देशमुख यांच्या कवितेतून दिसून येत नाही. जगण्याचे वास्तवच यामधून प्रदर्शित होते, असे मत चर्चासत्रात सहभागी कवींनी व्यक्त केले. परिवर्तन संस्थेतर्फे तीन दिवसीय ‘काव्योत्सवाचे’ आयोजन करण्यात आले असून शनिवारी कवी श्रीकांत देशमुख यांचा नवा काव्यसंग्रह ‘बोलावे ते आम्ही’च्या निमित्ताने ‘बोलावे ते आम्ही आणि नव्वदोत्तर मराठी कविता’ हे चर्चासत्र पार पडले. चर्चासत्रात महाराष्‍ट्रातून आलेले सुमारे 30 मान्यवर कवी, लेखक, समीक्षक सहभागी झाले आहेत.
या चर्चासत्राचे उद्घाटन ज्येष्ठ कवी शंकर पुणतांबेकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सुशील पगारीया तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शोभा शिंदे, मृणाल काळसेकर होते. प्रास्ताविक परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी केले तर हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तीन टप्प्यांमध्ये हे चर्चासत्र पार पडले.
डॉ. मिलिंद बागुल : दलित चळवळीचे तात्विक अधिष्ठान काही अंश देशमुखांच्या कवितेत आढळतात.
पी.विठ्ठल : स्त्रीची प्रतिमा, जाणिवा याचे प्रतिबिंब कवितेतून पुढे येते.
संजय जोशी : अनेक अंगांनी जगण्याशी संबंधित ही कविता आहे.
संजय चौधरी : शेतीशीच जुळलेला माणूस अशी कविता करू शकतो. जगणे आणि कविता यात भिन्नता दिसून येत नाही.
दा.गो.काळे : कुठल्याही कलाकृतीला काळाचे संदर्भ महत्त्वाचे असतात. बदलाचे प्रतिबिंब कवितेत आहेत.
गोविंद काजरेकर : जागतिकीकरणानंतर उद्ध्वस्त जगण्याचे चित्रण आहे.
महेंद्र कदम : जागतिकीकरणाचे परिणाम साहित्यावर, भारतीय जीवनावर दिसतात. नव्वदोत्तर कालखंड आधुनिक म्हणावा लागेल.
प्रवीण बांदेकर: जगणं सुरू असताना त्यातून आलेला विखंडितपणा यांचा परिपाक कवितेत ठळकपणे जाणवतो.