आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरिष्ठ महाविद्यालयांत प्रवेशाला नाही निकष!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-विद्यार्थ्यांच्या हातात गुणपत्रक आल्याने वरिष्ठ महाविद्यालयीन प्रवेशाचे दरवाजे खुले झाले. प्रवेशासाठी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी दिसू लागली आहे. शहरातील कुठल्याच महाविद्यालयांत सध्यातरी प्रवेशासाठी गुणवत्ता यादीचे निकष लावण्यात आलेले नाही. आठवडाभरापूर्वी बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर मंगळवारी विद्यार्थ्यांच्या हातात गुणपत्रकाची मूळ प्रत पडली. त्यामुळे आता खर्‍या अर्थाने वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. बुधवारी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दीदेखील पाहायला मिळाली. आजतागायत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसला तरी अर्ज विक्रीचा आकडा मात्र मोठा आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा बारावीची टक्केवारी उंचावली आहे. त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चुरस होईल, अशी अपेक्षा होती.
मात्र, महाविद्यालयांच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही प्रवेशाची स्थिती राहील. त्यामुळे कुठल्याच महाविद्यालयात प्रवेशासाठी गुणवत्ता यादीचे निकष नाही. अगोदर येणार्‍या विद्यार्थ्याला प्राधान्यक्रम देऊन प्रवेश दिला जाणार आहे. मूजे महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी 50 टक्के गुणांची अट घालण्यात आली आहे.
कागदपत्रे असेल तरच प्रवेश
प्रवेशासाठी गुणपत्रकासह अन्य कागदपत्रे असतील तरच प्रवेश मिळणार आहे. पूर्वी कागदपत्रे नंतर देतो, असे सांगून महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जात होता. आता ती पद्धत बंद झाली आहे.

अभियांत्रिकीचा प्रवेश 15 जूननंतर
अभियांत्रिकीच्या प्रवेशाच्या अद्याप तारखा जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, 15 जूननंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होतील, असे महाविद्यालयांतर्फे सांगण्यात आले. विद्यार्थी संख्येअभावी गेल्या वर्षी अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहिल्या होत्या.