आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Senior Social Worker Dr.Prakash Amate In Jalgaon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अस्वस्थ पिढी हे जिवंतपणाचे लक्षण; डॉ. प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- कोणत्याही कामात फळाची अपेक्षा करण्याआधी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक असते. आजही समाजात संवेदनशील लोक भरपूर आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांना पुढे आणण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शैक्षणिक चळवळ तयार झाली पाहिजे. आजची पिढी अस्वस्थ असून, हे जिवंतपणाचे लक्षण आहे. तसेच ही पिढी समाजात शैक्षणिक क्रांतीचे काम करत असल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांनी केले.
दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे उभारण्यात येणाºया दीपस्तंभ जीवनकौशल्य व स्पर्धा परीक्षा निवासी महाविद्यालयाच्या ‘गुरुकुल’ या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. त्रिमूर्ती इंजिनिअरिंग कॉलेजजवळील जागेत भूमिपूजन करण्यात आले. व्यासपीठावर मंदा आमटे, डॉ.अविनाश सावजी, बापूजी सिंघवी, मॅगसेसे पुरस्कारप्राप्त नीलिमा मिश्रा, प्रा.प्रकाश पाठक, डॉ.सोहनी, मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले उपस्थित होत्या.
50 हजार स्क्वेअर फुटांच्या जागेत दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा गुरुकुल उभारून त्यात तीन जिल्ह्यातील सुमारे 400 गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य निवासासह भोजनाची व्यवस्था केली जाणार असल्याचे ‘दीपस्तंभ’चे संचालक यजुर्वेंद्र महाजन यांना प्रास्ताविकात सांगितले. नीलिमा मिश्रा, शीतल उगले व ‘स्रेहालय’चे डॉ.गिरीश कुलकर्णी यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. आशा फाउंडेशनचे गिरीश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर बांधकाम व्यावसायिक भरत अमळकर यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा
प्रा.प्रकाश पाठक यांनी परिस्थिती अमान्य करण्यापेक्षा कृतीने मोठे यश निर्माण करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. तसेच नवीन पिढीला भावनिक पाठिंबा देऊन त्यांच्यातील क्षमता दाखवण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज मंदा आमटे यांनी व्यक्त केली. डॉ.अविनाश सावजी यांनी समाजात प्रचलित विचारपद्धती रूढ झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले.