आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वरिष्ठ टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हा क्रीडा संकुलावर झालेल्या राष्ट्रीय वरिष्ठ टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने पुरुष, महिला मिश्र दुहेरीत विजेतेपद प्राप्त केले.
भारतीय टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन महाराष्ट्र अॅम्युचर टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने १६वी राष्ट्रीय वरिष्ठ वयस्कर गटाच्या पुरुष, महिला टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुलावर करण्यात आले होते. या स्पर्धेत पुरुष गटात उपांत्यफेरीत पहिला सामना महाराष्ट्र विरुद्ध पाँडेचेरी संघात झाला. महाराष्ट्र संघाने २-० सेटमध्ये सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला; तर दुसरा उपांत्यफेरीचा समना मुंबई विरुद्ध केरळ संघात झाला. मुंबई संघ ३-१ असा सेटने सामना जिंकून अंतिम फेरीत दाखल झाला. अंतिम लढत महाराष्ट्र विरुद्ध मुंबई संघात अत्यंत चुरशीची झाली. महाराष्ट्र संघाने २-१ विजेतेपद पटकावले. उपविजेतेपद मुंबई संघाने तर तिसऱ्या स्थानी पाँडेचेरीचा संघ राहिला.
महिला वरिष्ठ गटात पहिला उपांत्यफेरीचा सामना महाराष्ट्र विरुद्ध पाँडेचेरी संघादरम्यान झाला. महाराष्ट्र संघाने हा सामना २-१ असा जिंकून अंतिम फेरी गाठली; तर दुसरा उपांत्यफेरीचा सामना विदर्भ विरुद्ध मुंबई संघात झाला. मुंबई संघाने २-१ लढत देऊन अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामना महाराष्ट्र विरुद्ध मंुबई संघात झाला. यात महाराष्ट्राच्या संघाने मुंबई संघाशी कडवी झुंज देत २-१ ने विजय मिळवला. यातही उपविजेता मुंबई तर विदर्भ संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. विजेत्या उपविजेत्या संघांना माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण करण्यात आले.
या वेळी प्रदेशाध्यक्ष विनोद देशमुख, टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ.व्यंकटेश वांगवाड(पुणे), शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त एन.डी.परवाले, राज्य सचिव आनंद खरे, प्रा.किरण नेहेते, प्रा.संजय चौधरी, प्रा.अनिता कोल्हे, आयोजन समितीचे अध्यक्ष उज्ज्वल पाटील, सचिव किशोर चौधरी आदी उपस्थित होते. स्पर्धेस तांत्रिक समितीचे चेअरमन गणेश साळवे होते. पंच म्हणून प्रा.रितेश वांगवाड, प्रफुल्ल बन्सोड, दिनेश सिंगाराम, अक्षय गामणो, विवेक शैलोटकर, गजानन शिंदे, भाग्यश्री पाटील, सन्ना शेख, विवेक मल्लीक उमेश सेनभक्त यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कोल्हे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी संघटनेचे अमोल चौधरी, हेमंत वाघ, मिलिंद तळेले, प्रा.किरण नेहेते, प्रमोद पाटील, प्रवीण चौधरी, दीपक नाईक, सुनील राजकोटिया, गणेश पाटील, मयूर पाटील, योगेश देवरे यांनी सहकार्य केले.
वयस्कर गटात विदर्भ विजेता
वयस्करगटात महाराष्ट्राच्या संघाला यश मिळवता आले नाही. या गटात विदर्भ संघाने विजेतेपद पटकावले. दुसऱ्यास्थानावर गोवा तर तिसऱ्या स्थानावर महाराष्ट्र संघ राहिला.
मिश्र दुहेरी गटातही यश
मिश्र दुहेरी गटात अंतिम सामना महाराष्ट्र विरुद्ध मुंबई संघात झाला. महाराष्ट्र संघाने २-१ ने मुंबईचा पराभव करून विजय मिळवला. मुंबई संघ उपविजेता तर केरळ तिसऱ्यास्थानी राहिला.
बातम्या आणखी आहेत...