आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर! आता सेन्सर चावी रोखणार दुचाकीची चोरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - चारचाकी गाड्यांप्रमाणे दुचाकी गाड्यांनादेखील सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सेन्सर चावी बसवण्यात येत आहेत. या चावीमुळे दुचाकी चोरीचे प्रमाण कमी होणार आहे. सेन्सर चावीमुळे इतर व्यक्तींकडून जरी बनावट चावीने दुचाकीचे लॉक उघडणाचा प्रयत्न केला तरीदेखील ते उघडले जाणार नाही, तसेच इंजीनदेखील सुरू होणार नाही. शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे गाडीला सेन्सर चावी बसवण्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दुचाकीच्या सुरक्षिततेसाठी काही मोटारसायकल कंपन्यांनी बाजारात नव्याने आलेल्या गाड्यांना सेन्सर चावीचे फीचर्स जोडले आहे. या फीचर्समुळे गाडी चोरी होण्याच्या भीतीपासून वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही सेन्सर चावी जुन्या मोटारसायकलींनादेखील सहज बसवता येणार आहे. बनावट चावीमुळे किंवा गाडीची वायरिंग तोडून चोर गाडी सुरू करू शकतात, मात्र, या चावीमुळे तसे होणार नाही. चावीशिवाय इतर कोणत्याही साधनाने गाडी सुरू करणे अवघड आहे. सेन्सर गाडीचा लॉक आणि इंजीन दोघांशी संबंधित असल्याने गाडी सुरू होऊ शकणार नाही.
मास्टर कीदेखील प्रभावहीन
जुन्या गाड्यांमध्येदेखील सेन्सर चावी लावणे शक्य आहे. गाडीला मास्टर की लावली तरीदेखील लॉक उघडत नाही. त्यामुळे आता भविष्यात बाजारात येणार्‍या सर्व नवीन गाडीच्या मॉडेल्समध्ये सेन्सर चावीचा समावेश असणार आहे.

दुचाकीचोरीचे प्रमाण अधिक
जिल्हाभरात दर महिन्याला 20 ते 25 गाड्या चोरीस जाण्याच्या तक्रारी पोलिसात येतात. यात वायरिंग तोडून गाडी सुरू करणे, बनावट चावीद्वारे लॉक उघडून गाडी चोरीस गेल्याच्या घटना घडतात. सेन्सर चावीमुळे या घटनांना आळा बसू शकणार आहे.