आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सेंट टेरेसा’मध्ये वाटल्या मुदत संपलेल्या गोळ्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - स्वातंत्र्यदिनी सेंट टेरेसा शाळेत विद्यार्थ्यांना ध्वजवंदनानंतर एक्सपायरी डेट पार केलेल्या चॉकलेटचे वाटप करण्यात आले. याबाबत विद्यार्थ्यांनी तक्रार केली असता, त्यांना शाळा प्रशासनाकडून दाद देण्यात आली नाही. तसेच पालकांनाही धमकावण्यात आले.

सेंट टेरेसा शाळेत सकाळी आठ वाजेच्या सुमारास ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना ‘पारले मॅँगो बाइट’ या गोळ्या वाटण्यात आल्या. या गोळय़ांचे पॅकिंग 4/11 (एप्रिल 2011)मध्ये झाले असून, त्यावर ‘बेस्ट बिफोर 12 मंथ फ्रॉम पॅकिंग’ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार एप्रिल 2012मध्ये या गोळ्या एक्सपायर झाल्या आहेत. ही बाब काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत शिक्षकांकडे तक्रार केली; मात्र त्यांनी विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. शिक्षकांच्या धाकाने विद्यार्थ्यांनी या प्रकाराबाबत बोलणे टाळेल; मात्र काही विद्यार्थ्यांनी घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर काही पालकांनी शाळेत जाऊन प्रशासनाला जाब विचारला असता, त्यांना समाधानकारक उत्तरे मिळू शकली नाहीत. या गोळय़ा खाल्ल्यानंतर काही विद्यार्थ्यांचे पोट दुखू लागले असल्याचेही पालकांनी सांगितले.
शाळेत झालेल्या प्रकाराबाबत आमची चूक झाली असल्याचे आम्ही पालकांसमोर मान्य केले होते; मात्र तरीही पालकांनी आमच्याशी अरेरावी केली. तसेच समजूत काढल्यानंतरही त्यांचा संताप कमी होत नव्हता. त्यामुळे तुमचा आमच्यावर विश्वास नसेल तर आपल्या पाल्याला आमच्या शाळेतून घेऊन जा, असे सांगितले. हा प्रकार जाणूनबुजून झाला नसून चुकून झाला आहे. सिस्टर नॉयल, उपप्राचार्या