आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरणावर सात बलून बंधारे; केंद्राची मान्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गिरणा नदीचे पात्र. - Divya Marathi
गिरणा नदीचे पात्र.
जळगाव - जिल्ह्यांतर्गतगिरणा नदीवर सात साठवण बलून बंधारे बांधण्यास केंद्र सरकारने प्राथमिक स्तरावर तत्त्वत: मान्यता दिली असून, तसे पत्र राज्य शासनाचे उपसचिव प्र.गो.मांदाडे यांनी तापी पाटबंधारे महामंडळाला साेमवारी दिले. या बंधाऱ्यांना नावीण्यपूर्ण योजना म्हणून केंद्राने मान्यता दिली असली तरी, विविध पर्यायांची व्यवहार्यता तांत्रिक बाबींच्या तपासणीअंती याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही या पत्रात स्पष्ट करण्यात अाले आहे.
जिल्ह्यातील गिरणा नदीच्या पट्ट्यातील पाच पालिका ९० गावांचा पाणीप्रश्न सुटावा म्हणून नदीच्या क्षेत्रातील ६५ किलोमीटर अंतरात सात साठवण बंधारे बांधण्याचा प्रस्ताव वजा मागणी खासदार ए.टी.पाटील यांनी केली होती. या मागणीवर केंद्रीय जलसंसाधनमंत्री उमा भारती यांनी याबाबत नोव्हेंबर २०१४च्या पत्रान्वये राज्य शासनाकडून अहवाल मागवला होता. या अहवालावर २५ जून रोजी नवीन तंत्रज्ञानाबाबत सादरीकरण चर्चेनंतर या प्रस्तावाला प्राथमिक मान्यता देण्यात आली.

गिरीश महाजनांचाही पुढाकार
गिरणानदीवरील प्रस्तावित सात बंधाऱ्यांचा प्रश्न धसास लावण्यासाठी कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी विभागाला दिल्याची माहिती तापी महामंडळाच्या अभियंत्यांनी दिली.

येथे बांधले जातील बंधारे
चाळीसगाव तालुका- मेहुणबारे, बहाळ, भडगाव तालुका- पांढरद, भडगाव, पाचोरा तालुका- परधाडे, कुरंगी जळगाव तालुका- कानळदा.

पाणीप्रश्न सुटावा म्हणून सतत पाठपुरावा सुरू
चाळीसगाव,पाचोरा भडगाव हे तालुके अवर्षणप्रवण म्हणून आेळखले जातात. या तालुक्यांतील पाणीप्रश्न कायमचा सुटावा म्हणून सात बंधारे बांधण्याचा विषय केंद्राकडे लावून धरला असून, एकूण खर्चापैकी ९० टक्के निधी केंद्र देईल. याबाबत राज्य शासनाकडूनही प्रतिसाद िमळत आहे, असे खासदार ए.टी.पाटील यांनी सांगितले.

कायआहे योजना? जलपातळी उंचावेल
गिरणानदीच्या दोन्ही तीरांवर जास्तीत जास्त सहा मीटर उंचीपर्यंत जलसाठा करण्यासाठी अाॅटोमॅटिक आॅपरेटेड आेबामेयर गेट उभारण्याची शिफारस करण्यात आली होती. जिल्ह्यातील गिरणा पात्रातील भूजलपातळी कमालीची खालावत चालली आहे. त्यामुळे नदीपात्रात नावीण्यपूर्ण बलून बंधारे बांधल्यास पाण्याची पातळी सावरता येईल.
बातम्या आणखी आहेत...